मराठवाड्यात दाणादाण

paithan-jayakwadi-dam
paithan-jayakwadi-dam

औरंगाबाद - मराठवाड्यात गुरुवारी (ता. २४) दमदार पावसाने हजेरी लावत पुन्हा तडाखा दिला आहे. सहा जिल्ह्यांतील ३१ मंडळांत अतिवृष्टी झाली. परभणीतील सेलू तालुक्यातील देऊळगाव येथे सर्वाधिक १९१, नांदेडच्या मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथे १३४, बीडमधील आडगाव येथे १८०, तर नित्रूड येथे १०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, सहा जिल्ह्यांतील ३१ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. बीडमधील वडवणी, परभणीतील सेलू, पाथरी, मानवत; लातूरमधील अहमदपूर, नांदेडमधील मुखेड तालुक्‍यात जोरदार पाऊस झाला. या पावसाने खरिपातील सोयाबीन, मका, कपाशी आदी पिकांना फटका बसला. सीताफळासह इतर फळपिकांचे मोठे नुकसान झाले. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील २७२ मंडळांपैकी २५६ मंडळांत पावसाची हजेरी लागली. नांदेड, परभणी जिल्ह्यांतील १५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी मंडळात सर्वाधिक १३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जायकवाडीतून विसर्ग
जायकवाडी प्रकल्पाचे १६ दरवाजे शुक्रवारी पहाटे तीन वाजेपासून अडीच फुटांनी उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीपात्रात सुमारे ४३ हजार ५०० क्‍युसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com