नाचनवेल परिसरात जोरदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

नाचनवेल (ता. कन्नड) परिसरात मंगळवारी (ता. आठ) दुपारी तीनच्या सुमारास तासाभराच्या जोरदार पावसाने झोडपल्याने रब्बीच्या पिकाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परतीच्या पावसाने विजयादशमीच्या सणाच्या दिवशी दुपारी जोरदार हजेरी लावली.

नाचनवेल (जि.औरंगाबाद) : नाचनवेल (ता. कन्नड) परिसरात मंगळवारी (ता. आठ) दुपारी तीनच्या सुमारास तासाभराच्या जोरदार पावसाने झोडपल्याने रब्बीच्या पिकाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परतीच्या पावसाने विजयादशमीच्या सणाच्या दिवशी दुपारी जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतातून पाणी वाहिले. सायंकाळी नदीला पाणी आले होते. या पावसाने खरिपाच्या पिकाला पाणीपाळी देण्याची गरज भासणार नाही. हा पाऊस येण्याअगोदर काही शेतकऱ्यांनी मका पीक तोडून व सोंगून ठेवल्याने चारा खराब होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
आता आठवडाभर शेतीची कामे लांबणीवर पडणार आहेत. या पावसात काही अंशी वादळी हवेमुळे उभे मका पीक काही ठिकाणी आडवे झाले. तसेच नाचनवेल चौफुलीवर पथकाची राहुटी कोलमडून पडली. त्यामुळे बैठे पथकातील कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली. अजूनही परतीच्या पावसाची दाट शक्‍यता आहे. त्यानुसार शेतकरी इतर कामांना प्राधान्य देत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain In Nachanwel Area