नांदेडमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

शहरात रविवारी (ता.सहा) सकाळपासून असलेले उन्ह अचानक दुपारी दाेन ते अडीचच्या दरम्यान गायब झाले अन् सर्वत्र आभाळाची दाट छाया पसरल्याचे पाहायला मिळाले.

नांदेड : शहरात रविवारी (ता.सहा) सकाळपासून असलेले उन्ह अचानक दुपारी दाेन ते अडीचच्या दरम्यान गायब झाले अन् सर्वत्र आभाळाची दाट छाया पसरल्याचे पाहायला मिळाले.

दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेला पावसाचा शिडकावा आणि त्यानंतर सर्वत्र आभाळ भरून आल्याने दुपारी अडीचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जाेरदार पावसाच्या सरी बरसल्या. नांदेड शहरासह सिडकाेतही हा पाऊस झाला. जिल्ह्यातील सहस्त्रकुंड, नायगाव तालुक्यातील कुंटूर, सातेगाव परिसरात तब्बल अर्धा तास मेघगर्जनेसह पाऊस झाला.

नांदेड : वीज पडून चार जनावरे दगावली

तसेच हाणेगाव परिसरात काेकलगाव येथे वीज पडून चार जनावरे दगावली. या परिसरात एक तास मुसळधार पाऊस झाला. अर्धापूर येथेही पावसाने हजेरी लावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain in Nanded