परभणी जिल्ह्यातील चार मंडळात अतिवृष्टी

कैलास चव्हाण
सोमवार, 11 जून 2018

परभणी :  जिल्ह्यात रविवारी (ता.10) रात्री पावसाने चांगली हजेरी लावत संपूर्ण जिल्ह्याला झोडपले. मेघगर्जनेसह चांगलाच पाऊस पडला. चार मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मध्यरात्री पर्यंत झालेल्या पावसाने जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीची शंभरी ओलांडली आहे.

परभणी जिल्ह्यात सलग दहाव्या दिवशी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कापुस लागवडीला प्रारंभ केला आहे. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहील्यानंततर रात्री आठच्या दरम्याण काही भागात पावसाला सुरुवात झाली. जोराच्या वाऱ्यामुळे पूर्णा, परभणी तालुक्यात झाडे पडली. विज तारा तुटल्याने अनेक गावातील विज पुरवठा खंडीत झाला.

रात्री नऊनंतर पुन्हा जोरदार पावसाने झोडपुन काढले. रविवारच्या पावसाने वार्षिक सरासरीची शंभरी ओलांडली आहे. एकुण 774.62 मिलीमिटर एवढी जिल्ह्याची वार्षिक सरासरी असून त्यापैकी 111.24 मिलीमिटर पाऊस (ता.10) जुन पर्यंत झाला आहे. रविवारी (ता.10) मध्यरात्री  परभणी (28.25), पालम(12),पूर्णा (51.60), गंगाखेड (8.75), सोनपेठ (26), सेलु(30.40), पाथरी(18.67), जिंतूर(27.83), मानवत(52.33) असा एकुण 28.43स मिलीमिटर पाऊस झाला. पूर्णा तालुक्यातील ताडकळस मंडळात (81),चुडावा मंडळात (63),सेलु तालुक्यातील देऊळगाव मंडळात (70), मानवत मंडळात (75) मिलीमिटर अशी अतिवृष्टीची  नोंद झाली आहे.

Web Title: Heavy rain in Parbhani district