नांदेड : मरखेलमध्ये ८९ मिलिमीटर पावसाची नोंद

rain-nanded.jpg
rain-nanded.jpg

मरखेल, (नांदेड) : देगलूर तालुक्यातील मरखेल परिसरात शुक्रवारी (ता. १८) रोजी सायंकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील ऐन काढणीला आलेल्या सोयाबीन व ज्वारी या पिकांची अत्यंत मोठ्या प्रमाणात नासाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पावसाची नोंद ही कालच्या पावसामुळे झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मरखेल परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास हा पाऊस सुरु हाेता. यावेळी काढणीत व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांची काढणी करताना उघड्यावर पिके ठेवलेली आहेत. परतीच्या पावसाने खरिपातील तूर, कापूस या पिकांना जरी फायदा होणार असला तरीही ऐन हंगामात आलेल्या पिकांचे मात्र नुकसान होणार आहे. देगलूर तालुक्यातही सर्वदूर पाऊस झाला असून, मरखेल मंडळात ८९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

दरम्यान, सरासरीच्या वार्षिक तुलनेत आजपर्यंत या भागात ६३८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर देगलूर मंडळात (९६), खानापूर (८१), शहापूर (७२), माळेगाव (३५), व हणेगाव मंडळात ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल शुक्रवारी पडलेला पाऊस हा यावर्षीचा मोठा पाऊस होता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com