विदर्भालगतच्या तालुक्यात मुसळधार

rain.jpg
rain.jpg

नांदेड : विदर्भालगत असलेल्या किनवट, माहूर, हिमायतनगर व हदगाव या तालुक्यात मंगळवारी (ता. 17) जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे किनवट मधील शिवनी मंडळात 79 मिलिमीटर पाऊस झाला.

यामूळे येथे अतिवृष्टी नोंदली. बुधवारी (ता. 18) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण 255.95 मिलीमीटरनुसार सरासरी 16 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आजपर्यंत 683.08  मिलिमीटरनुसार 71.48 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे. मंगळवारी (ता. 17) विदर्भालगत असलेल्या किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर तालुक्यात जोरदार झाला. या सोबतच बिलोली, भोकर, धर्माबाद, लोहा या तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. मंगळवारचा पाऊस किनवट तालुक्यात 55 मिलिमीटर, माहूर 33.75, हदगाव 16.43, हिमायतनगर 34.67, भोकर 24.25, लोहा 16.67, बिलोली 16, धर्माबाद 21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

दरम्यान, चोवीस तासात जिल्ह्यात एकूण 255.95 मिलिमीटर नुसार सरासरी 16 मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात आजपर्यंत 683.08 मिलिमीटर नुसार 71.48 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारचा पाऊस माहूर मंडळात 28 मिलीमीटर, वानोळा 42, वाई 46, लोहा 25, शेवडी 24, कापशी 20, धर्माबाद 25,  जारिकोट 20, कुंडलवाडी 42, सरसम 52, जवळगाव 32, हिमायतनगर 20,  शिवनी 79, मांडवी 61, दहेली 55 जलधारा 54, किनवट 56, इस्लापूर 42, बोधडी 42, भोकर 27, किनी 24, जलधारा 30 व आष्टी मंडळात 21 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com