जालना : घनसावंगी तालुक्यात जाेरदार पाऊस

cottan.jpg
cottan.jpg

घनसावंगी (जि. जालना) : घनसावंगी तालुक्यात पावसळ्यात कोरडे असलेले नदी-नाले परतीच्या पावसाने ओसंडून वाहू लागल्याने पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे, तर दुसरीकडे खरिप हंगामाच्या पिकांवर परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.

घनसावंगी तालुक्यात यंदा पावसाळ्यात पावसाने उशिरा आगमन केले त्याचबरोबर यंदा पाऊस चांगल्या प्रमाणात झाला नाही. जो झाला तो ही पोळा सणानंतर उघडला होता. नवरात्रात शेतकर्‍यांना अपेक्षा होती पाऊस येईल मात्र तेव्हा आला नाही, मात्र नुकताच या आठवड्यात परतीच्या पावसाने जोरदार आगमन केले. या आठवड्यातील पावसाने सरासरी गाठली असल्याचे दिसत आहे.

पावसाळ्यात नदी, नाल्यात पाणी आले नाही जे पाणी आले ते आटून गेले, त्यामुळे सिंचन प्रकल्पात पाणीसाठा आला तर नाहीच उलट ही नाले कोरडी पडली होती. या पावसामुळे नदी व नाल्याना चांगले पाणी आले असून, विशेष म्हणजे पहिल्यांदा पाणी ओसाडूंन वाहत आहे.

या पावसामुळे पाणीपातळीत चांगलीच वाढ होणार आहे. यापुढे पावसांचा असाच चांगला जोर राहील्यास सिंचन प्रकल्पात पाणी जाण्यास मदत होणार आहे. तुरीकरीता पोषक तर कापसाचे नुकसान सध्या सुरू असलेला पाऊस हा खरिपातील तूर या पिकासाठी पोषक ठरत आहे. तुरीची चांगली वाढ होत आहे. मध्यंतरी कोरडवाहू कापसाला पाण्यची गरज होती, त्यावेळी परतीच्या पावसाने या कापसाला मदत झाली आहे. मात्र पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

खरिपातील कोरडवाहू शेतीतील कापूस फुटत आहे. बोंडे काळी पडत आहेत, आधीच या पावसामुळे कपासांचा दर्जा घसरला असतांना पुन्हा या पावसामुळे कापसाचे नुकसान होत असल्याने हा कापूस शेतकर्‍यांना मातीमोल भावात विक्री करावी लागणार आहे. त्यामुळे बाजारभावात नुकसान सोसावे लागणार असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com