लातूर : तांदूळजा, चिंचोलीत मुसळधार पाऊस

rain-latur.jpg
rain-latur.jpg

लातूर : पावसाळा संपत आला तरी लातूर जिल्ह्यात मोठ्या पावसाची हजेरी झाली नव्हती. पण परतीच्या पावसाने लातूरला थोडासा दिलासा दिला आहे. लातूर तालुक्यातील तांदूळजा महसूल मंडळात १७० तर चिंचोली महसूल मंडळात ११२ मिलीमीटर पाऊस पडला.

दरम्यान, या अतिवृष्टीमुळे या मंडळातील नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. तर काही ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे मांजरा नदीलाही पाणी आले आहे. या पाऊस रब्बीसाठी चांगला असल्याचे मानले जात आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर वातावरण ढगाळ राहिले. रात्रीच्या वेळी मात्र जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी तर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच ५३ महसूल मंडळात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे.

लातूर २९, कासारखेड २४, गातेगाव ५०, तांदूळजा १७०, मुरुड १६, बाभळगाव२५, हरंगुळ ४४, चिंचोली ११२, औसा १३, किल्लारी २४, मातोळा २६, भादा २६, किनीथोट ११, बेलकुंड २०, रेणापूर १३ , पोहरेगाव ३३, कारेपूर १५, पानगाव १०, उदगीर १४, मोघा २७, हेर २१, देवर्जन ४२, वाढवणा २०, नळगीर १४, नागलगाव २०, अहमदपूर २३, किनगाव १४, खंडाळी ८, शिरुर ताजबंद ३५, हाडोळती १२, अंधोरी ९, चाकूर १४, वडवळ १४, नळेगाव ४२, झरी २०, शेळगाव २१, जळकोट १९, घोणसी निलंगा तीन, अंबुलगा ११, कासारशिरसी तीन, मदनसुरी ९, निटूर २५, पानचिंचोली ४८, दवणी ४२, वलांडी ३२, बोरोळ ४१, शिरुर अनंतपाळ ४०, हिसामाबाद ३२, साकोळ ४० मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे मांजरा नदीलाही पाणी आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com