परभणी जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस

rain-wa.jpg
rain-wa.jpg

परभणी : विधानसभा निवडणुकीत राजकीय मंडळीकडून अश्वासनांचा महापूर आल्यानंतर आता शनिवारी रात्रीपासून पावसाने झोडपून काढत खराखुरा महापूर आणला आहे. मागील 14 तासांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून, आठ मंडळात अतिवृष्ठी झाली आहे. सेलू तालुक्यात अक्षरक्ष: ढगफुटीसारखी स्थिती आहे. 

दरम्यान, सेलू शहर आणि देऊळगाव मंडळात प्रत्येकी 157 आणि 165 एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे दुधना, थुना नद्यांना पुर आला आहे. मागील काही दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. सप्टेंबर  महिण्यात सातत्याने पाऊस पडल्यानंतर जून आणिजुलेै महिण्यातील तुट भरुन काढणारा पाऊस ऑक्टोबर महिण्यात पडू लागला आहे.

मागील आठवड्यात परतीचा पाऊस गेल्यानंतरही शुक्रवारी रात्री जिल्ह्यात पाऊस झाला. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहीले. रात्री 10 च्या सुमारास  धोधो स्वरुपात पाऊस झाला. रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत जोरदार पाऊस सुरु राहीला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुन्हा ढग 
दा़टून आले आहेत. सेलू तालुक्यात रात्री जाेरदार पाऊस झाला. सेलू मंडळात 157 तर देऊळगाव गगात मंडळात 165 एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. याच तालुक्यात सर्वच मंडळात अतिवृष्ठी आहे. हा पाऊस पाथरी, पूर्णा, परभणी या मंडळात अधिक होता.

या पावसामुळे काढणी सुरु असलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून, कापनी केलेले पिक मातीत मिसळले आहे. अनेक ठिकाणी कपाशी वेचणी आलेले असून, या पावसाने कपाशी पूर्णपणे भिजली आहे.

आठ मंडळात अतिवृष्ठी
सेलू,157, देऊळगाव 165, कुपटा- 85, वालूर- 90, चिकलठाणा- 92, पाथरी- 99, हादगाव- 78, कातनेश्वर- 95 या मंडळात अतिवृष्ठी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com