नांदेड : कंधार तालुक्यासह जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

नांदेड : जिल्ह्यात बुधवारी (ता. 7) रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कंधार तालुक्यात सरासरी 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर इतर नऊ मंडळातही जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे अतिवृष्टीची नोंदली.

जिल्ह्यात गुरुवारी (ता. 7) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी 29.37 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आजपर्यंत जिल्ह्यात 469.65 मिलिमीटर नुसार 49.14 टक्के पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यासह तेवीस महसूल मंडळातील पावसाचे प्रमाण चांगले आहे. तालुकानिहाय झालेला पाऊस कंधार 65 मिलिमीटर, बिलोली 56.80, लोहा 53, मुखेड 48.71, नायगाव 44.20, देगलूर 30, देगलूर 30.50, उमरी 32.67, धर्माबाद 30.67, मुदखेड 24, नांदेड तालुक्यात 20.38 मिलिमीटर पाऊस झाला.

या सोबतच जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या सर्कलमध्ये सोनखेड 72 मिलिमीटर, कंधार 71, फुलवळ 65, पेठवडज 87, सगरोळी 72, आदमपूर 68, चांडोळा 90 व मुखेड 68 मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे जलस्त्रोत्रांना पाणी आल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच टँकर तसेच अधिग्रहण बंद करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rains in all tehsil of Nanded district