हिंगोलीत दमदार पाऊस; पाच मंडळात अतिवृष्टी

मंगेश शेवाळकर
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

हिंगोली जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी दमदार पाऊस झालाच नव्हता. विस्कळीत स्वरूपात होत असलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी टंचाईग्रस्त भागातील पाणीप्रश्न काय होता. त्यामुळे भर पावसाळ्यातही तब्बल 42 गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे चित्र होते.

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यांमध्ये या वर्षीच्या पावसाळ्यातील प्रथमच दमदार पाऊस झाला असून पाच मंडळांमध्ये आतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांसह टंचाईग्रस्त भागातील गावकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी दमदार पाऊस झालाच नव्हता. विस्कळीत स्वरूपात होत असलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी टंचाईग्रस्त भागातील पाणीप्रश्न काय होता. त्यामुळे भर पावसाळ्यातही तब्बल 42 गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे चित्र होते. जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी काही भागात दमदार तर काही भागात हलका पाऊस सुरू होता. मात्र शुक्रवारी ( ता. 2) रात्रीपासून जिल्ह्याला दमदार पाऊस झाला आहे.

यामध्ये पाच मंडळामधून अतिवृष्टी झाली असून कळमनुरी मंडळात 92 मिलीमीटर नांदापूर 78, आखाडा बाळापुर 66, वाकोडी 75, आजेगाव मंडळांमध्ये 80 मिलिमीटर पावसाची नोंद आज सकाळी आठ वाजेपर्यंत झाली आहे. याशिवाय हिंगोली मंडळामध्ये 55, खांबाळा 48 माळहिवरा 55, सिरसम बुद्रुक 59, बासंबा 26, नरसी नामदेव 29, डिग्रस कऱ्हाळे 58, डोंगरकडा 61, वारंगा फाटा 56, सेनगांव 42 गोरेगाव 52, साखरा 60, पानकनेरगाव 48, हत्ता 44, वसमत 41, हट्टा 62, गिरगाव 38 कुरुंदा 58, टेंभुर्णी 40 आंबा साठ, हयात नगर 50, औंढा नागनाथ 62, जवळाबाजार 47 येळेगाव 60, तर साळणा मंडळांमध्ये 45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना बऱ्यापैकी पाणी आली असून नाले वाहती झाले आहेत.

जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला तालुका निहाय व कंसात एकूण पाऊस पुढील प्रमाणे हिंगोली 47.5 14 मिलिमीटर (306.09), कळमनुरी 71. 33 (400), सेनगाव 54. 33 ( 307), वसमत 50.29 (223), औंढा नागनाथ 53. 50 ( 389 ) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या 36 टक्के पाऊस झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rains in Hingoli district