esakal | जालना : बदनापूर तालुक्यातील दोन मंडळात अतिवृष्टी 
sakal

बोलून बातमी शोधा

rain image.jpg

 जालना जिल्ह्यात सोमवारी (ता.१३) रात्री अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. या पावसाचा जोर जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात होता. दरम्यान बदनापूर तालुक्यातील दोन मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. यात बदनापूर मंडळात ७७ मिलिमीटर तर बदनापूर तालुक्यातील रोषणगाव मंडळात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात ७.८ मिमिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

जालना : बदनापूर तालुक्यातील दोन मंडळात अतिवृष्टी 

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : जालना जिल्ह्यात सोमवारी (ता.१३) रात्री अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. या पावसाचा जोर जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात होता. दरम्यान बदनापूर तालुक्यातील दोन मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. यात बदनापूर मंडळात ७७ मिलिमीटर तर बदनापूर तालुक्यातील रोषणगाव मंडळात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात ७.८ मिमिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. ता. एक जून ते आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३४३.२३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता.१४) सकाळपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये ७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात बदनापूर तालुक्यात सर्वाधिक ४२.६० मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर बदनापुर तालुक्यातील दोन मंडळात अतिवृष्टी झाली असून बदनापूर मंडळात ७७ मिलिमीटर, रोषणगाव मंडळात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर याच तालुक्यातील बावणे पांगरी मंडळात ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच जालना तालुक्यातील जालना मंडळात २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

दरम्यान जालना तालुक्यात ३.३८ तर आतापर्यंत ३२५ मिलिमीटर, बदनापूर तालुक्यात ४२.६० तर आतापर्यंत ४४६.२० मिलिमीटर, भोकरदन तालुक्यात ९.३८ तर आतापर्यंत ३३४.८३ मिलिमीटर, जाफराबादा तालुक्यात १ तर आतापर्यंत २९०.४० मिलिमीटर, मंठा तालुक्यात ३.५७ तर आतापर्यंत २९२.५० मिलिमीटर, अंबड तालुक्यात २.२९ तर आतापर्यंत ४५५.८५ मिलिमीटर तर परतूर तालुक्यात आतापर्यंत २७० मिलिमीटर, घनसावंगी तालुक्यात आतापर्यंत ३४१.०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

दोन तालुक्यासह ३४ मंडळे कोरडे
जिल्ह्यात समोवारी (ता.१३) जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र, परतूर आणि घनसावंगी तालुक्याला पावसाने हुलकवणी दिली. तर जिल्ह्यातील ४९ मंडळापैकी ३४ मंडळही सोमवारी (ता.१३) कोरोडेच राहिले आहेत.

(संपादन : प्रताप अवचार)

loading image