फुलंब्री शहर, तालुक्‍यात जोरदार पाऊस

नवनाथ इधाटे
रविवार, 1 सप्टेंबर 2019

गेल्या महिनाभरापासून तालुक्‍यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. खरिपात लागवड केलेल्या पिकांनी माना टाकल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. शनिवारी (ता. 31) चारच्या दरम्यान पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकरी सुखावला आहे.

फुलंब्री, ता. 31 (जि.औरंगाबाद) : गेल्या महिनाभरापासून तालुक्‍यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. खरिपात लागवड केलेल्या पिकांनी माना टाकल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. शनिवारी (ता. 31) चारच्या दरम्यान पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकरी सुखावला आहे.

फुलंब्री-खुलताबाद रस्त्यावरील वाहतूक सुमारे एक-दीड तास ठप्प झाली होती. याचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. पाण्याचा प्रवाह वाढल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. सकाळपासूनच ढगाळ, गरमटीचे वातावरण होते. कधी दमदार, तर कधी रिमझिम पाऊस पडत होता. अचानक पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले. शेतातून पाणी वाहू लागले.

पाण्याचा प्रवाह वाढल्याने अचानक रस्त्याच्या मध्यभागी प्रवाशांना घेऊन जाणारी रिक्षा बंद पडली. त्यामुळे प्रवाशांनाच रिक्षाला दे धक्का करावे लागले. बंद पडलेल्या "इनोव्हा'लाही धक्का देऊनच पाण्याबाहेर काढावे लागले. रस्त्यावर पाणी साचल्याने पालकांनी लहान मुलांना डोक्‍यावर उचलून नेले. रस्त्यावर सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे पर्याय रस्त्यावरील नाल्याला वाहतुकीच्या ठिकाणी खोळंबा झाला होता. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक रस्त्यावर पाणी आल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heay Rain In Phulambri City, Taluka