दौलताबादला हेलिकॉप्टर सेवा सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

दौलताबाद - दौलताबाद येथील पर्यटनाला आता हेलिकॉप्टरची जोड मिळाली असून रविवारपासून (ता. एक) पुण्यातील एलोर एव्हिएशन या कंपनीच्या पुढाकारातून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर येणारे पर्यटक अधिकाधिक वेळ दौलताबादमध्ये थांबावेत, यासाठी नौकाविहार, हॉर्स रायडिंग, उंट सवारी यांसह हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली असून देश-विदेशातील पर्यटकांसह औरंगाबाद-जालना शहरातील पर्यटक वीकेंडकरिता या भागात मोठ्या संख्येने येतात. 

पर्यटनासाठी विविध पर्याय असायला हवेत, या दृष्टीने पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. यंदा नव्याने पहिल्यांदाच हेलिकॉप्टर राईड सेवा येथे सुरू करण्यात आल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात येण्यास मदत होणार आहे.

परिसरात मागील काही दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असल्याने हा परिसर हिरवाईने नटला आहे. त्यातच रविवारची सुटी असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. मोमबत्ता तलाव, घाट आदी ठिकाणे हिरवाईने नटल्याने पावसाची मजा घेत मकाची कणसे खाण्याचा आनंद शहर व इतर ठिकाणांहून आलेले पर्यटक घेत असल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. रविवारची सुटी असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते, परंतु दौलताबाद किल्ल्याच्या तटबंदीत झालेल्या वाहतूक कोंडीने दिवसभर वाहतूक ठप्प होत होती. यामुळे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला.

Web Title: helicopter service in daulatabad