लातूरात आता हेल्मेट सक्ती; मंगळवारपासून होणार अंमलबजावणी

Helmet is compulsary in latur will be implemented from Tuesday
Helmet is compulsary in latur will be implemented from Tuesday

लातूर : दुचाकी चालवताना हेल्मेट नसले तरी वाहतूक पोलिस आजवर कुठलाही दंड करत नव्हते; पण आता यापुढे तुम्ही हेल्मेट न घालता दुचाकी चालवली तर पाचशे रूपयांचा दंड मोजावा लागणार आहे. शहर आणि जिल्ह्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला आहे. पण लातूरकर या निर्णयाचे स्वागत करणार की इतर शहरांप्रमाणेच लातूरातही या निर्णयाला विरोध होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

वाहतूकीचे नियम डावलून वाहने चालविणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनविरोधात धडक मोहिम राबविल्यानंतर आता वाहतूक पोलिसांनी हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला आहे. हेल्मेट बरोबरच सिट बेल्ट न लावणे आणि मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या चालकांवर मंगळवारपासून (ता. 16) कडक कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई शहर परिसर आणि जिल्ह्यात होणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी गुरूवारी (ता. 11) दिली.

वाहनचालकांनी वाहतूकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. या पुढे दुचाकीचालकांनी हेल्मेट घालूनच दुचाकी चालवावी. शिवाय, चारचाकी वाहन चालवताना सिट बेल्ट लावावे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
- गजानन भातलवंडे, वाहतूक पोलिस निरिक्षक

असा आहे दंड -
- हेल्मेट न वापरणे : 500 रुपये 
- सिट बेल्ट न लावणे : 200 रुपये
- मोबाईलवर बोलत वाहन चालवणे : 200 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com