लातूरमध्ये हेल्मेट सक्ती नाहीच : पोलिस अधीक्षक

Helmet is not compulsory in Latur says Superintendent of Police Dr Mane
Helmet is not compulsory in Latur says Superintendent of Police Dr Mane

लातूर : काही दिवसांपूर्वी शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने 16 ऑक्टोबरपासून शहरात हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे लातूरकर हवालदिल झाले होते. राज्यात कोणत्याच मोठ्या शहरात हेल्मेट सक्ती नाही, असे असतानाच लातुरातच त्याची सक्ती का ? असा सवालही उपस्थित केला जात होता. याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र
माने यांनी शहरात हेल्मेटसक्ती नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. मात्र, त्यासोबतच आमचा जनजागृतीवर भर राहणार असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

गेल्या आठवड्यात शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी 16 ऑक्टोबरपासून शहरात हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. हेल्मेट न वापरणाऱया दुचाकी वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई
करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच हेल्मेटचा वापर न केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार पाचशे रुपये दंड करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. काकासाहेब डोळे व पोलिस उपअधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली
ही कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. याबाबतच्या बातम्याही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्या होत्या. शहर वाहतूक पोलिसांनी अचानक दिलेल्या या इशाऱ्यामुळे लातूरकर हवालदिल झाले होते.

राज्यात कोणत्याच शहरात हेल्मेटची सक्ती नाही, असे असताना
लातूरमध्येच सक्ती का असे प्रश्नही उपस्थित केले जात होते. काही जणांनी तर यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली होती. हेल्मेटची सक्ती होणार हे लक्षात आल्यानंतर शहरात रस्त्या-रस्त्यावर हेल्मेटची दुकाने थाटण्यात आली होती.  त्यानंतर वाढीव किंमतीने हेल्मेटची विक्रीही सुरु झाली होती. या सक्तीला विरोधही होऊ लागला होता.

याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. माने यांनी स्पष्टीकरण दिले. शहरात हेल्मेटची सक्ती करण्यात येणार नाही. पण लोकांमध्ये जाऊन जनजागृतीवर आमचा भर राहील. सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट महत्वाचे आहे. त्यामुळे वाहनधारकांनी त्याचा वापर करावा, असे आवाहनही डॉ. माने यांनी केले. पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट भूमिका घेतल्याने लातूरकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com