नव्या दुचाकीसोबत हेल्मेट; अंमलबजावणीला सुरवात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मे 2019

नव्या दुचाकीसोबत हेल्मेट देण्याच्या आदेशाची सोमवारपासून (ता. 27) अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

औरंगाबाद - नव्या दुचाकीसोबत हेल्मेट देण्याच्या आदेशाची सोमवारपासून (ता. 27) अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. अचानक सुरू केलेल्या या सक्तीने वितरक आणि ग्राहकांत वाद उद्‌भवत आहेत; मात्र आठवडाभरात अंमलबजावणी सुरळीत होईल, असा विश्‍वास सहायक प्रादेशिक अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी व्यक्त केला. 

नवीन दुचाकीसोबत हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील सर्व वाहन वितरकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सूचना दिल्या आहेत. याशिवाय मोटार निरीक्षकांकडून नवीन दुचाकी घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडून हेल्मट मिळाल्यासंदर्भात खात्री करून घेतली जात आहे. त्या संदर्भात ग्राहकांची स्वाक्षरीही घेतली जात आहे. उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेनंतर नवीन वाहन नोंदणीच्या वेळी वाहनाच्या उत्पादकाद्वारे वितरकांमार्फत ग्राहकांना हेल्मेट देण्यासंदर्भात खातरजमा करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. त्यामुळे नव्या दुचाकीसोबत हेल्मेट दिले गेले आहे, याची आरटीओ कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षकांकडून पडताळणी केली जात आहे. हेल्मेट दिलेले असल्याची खात्री झाल्यानंतर दुचाकींची नोंदणी करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helmets with a new bicycle