दोन मित्रांच्या साहाय्याने भावाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

लातूर - गेल्या महिन्यात येथील एका भोळसर तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या तरुणामुळे होत असलेल्या त्रासामुळे भावानेच त्याचा दोन मित्रांच्या साहाय्याने खून केल्याचे उघड झाले आहे. या भावाला व त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. 18) अटक केली आहे. येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद झाली आहे. 

येथील क्वाईलनगर भागातील सूरज गणपती अंकुशे (वय 26) या तरुणाचा 20 ऑक्‍टोबर रोजी खून झाला होता. धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार करून त्याचा मृतदेह टागोर उद्यानात टाकून देण्यात आला होता. या
प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. 
या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे, उपनिरीक्षक व्ही. एस. नवले, पोलिस महादेव बेलापट्टे, भीमाशंकर
बेल्लाळे, दत्ता शिंदे आदी करीत होते. 

गेल्या काही दिवसांपासून तपास सुरु होता; पण पोलिसांना सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी या तरुणाच्या भावावरच लक्ष केंद्रित केले. त्याच्या व त्याच्या मित्राच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. यातून त्यांना
ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता सख्ख्या लहान भावानेच या तरुणाचा खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. भोळसर भावाचे अस्वच्छ राहणे, वागणे याचा त्याला त्रास होत होता. या सर्व प्रकारातून त्याचा
मित्राच्या साहाय्याने चाकूने व लोखंडी गजाने वार करून खून केल्याची कबुली मृताचा भाऊ अक्षय ऊर्फ भुऱ्या गणपती अंकुशे याने दिल्याची माहिती उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली. 

याप्रकरणी अक्षय अंकुशे, त्याचे मित्र परमेश्वर हनुमंत रणदिवे व यश ऊर्फ मुकड्या श्रीनिवास वासरे या तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली. 

Web Title: With the help of two friends murdered brother

टॅग्स