पर्वताएवढे दुःख लपवून नववधूची पाठवणी

पर्वताएवढे दुःख लपवून नववधूची पाठवणी

औरंगाबाद - लग्न लागत असताना वधूचे व्याकूळ डोळे पित्याला शोधत होते; पण ते जगात नाहीत याची किंचितही कल्पना तिला नव्हती. अखेर तिने ‘पप्पा कुठाय’ हा शब्द उच्चारताच नातलगांनी तात्पुरती वेळ मारून तिची समजूत काढली. लग्नानंतर आप्तेष्टांचा कंठ दाटून आला. साश्रुनयनांनी तिला सासरी पाठविण्यात आले. सासरी जाताना मात्र, तिला वडिलांचे दर्शन घेता आले नाही. पित्याच्या गैरहजेरीतच तिची पाठवणी करण्यात आली, त्यावेळी अनेकांची हृदये पिळवटून आली.

मनजित कोळेकर यांच्या आत्महत्येनंतर कॉलनीतील सुजान नागरिकांनी धावाधाव केली. घाटीत मृतदेह नेल्यानंतर तिथे काहीजण बसून होते. लग्न लागेपर्यंत दुःखद घटनेबाबत कुणालाही काहीच कळू द्यायचे नाही, असा निर्णय घेऊन नवरदेव-नवरीच्या अंगावर अक्षता टाकण्यात आल्या. दुपारी पावणेदोनला लग्न लागले. यानंतर तिला पतीसोबत सासरी पाठविण्यात आले. त्यावेळीही तिची पित्यासाठी तळमळ सुरूच होती. पण, त्यांना हृदयविकाराच्या आजारामुळे रुग्णालयात पाठविण्यात आल्याची बाब सांगण्यात आली. त्यानंतर तिला लगेचच सासरी पाठविण्यात आले. इकडे घाटी रुग्णालयात सायंकाळी पिता मनजित कोळेकर यांची उत्तरीय तपासणी झाली. त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नसून कौटुंबिक किनार असल्याची माहिती पोलिस नाईक सोमिनाथ कोलते यांनी दिली.  

जगण्याने छळले होते...
कोळेकर यांनी लग्नाच्या पाच दिवस आधी अर्थात बारा डिसेंबरला मुलीचा व तिच्या भावी पतीचा फोटोही त्यांच्या फेसबुक वॉलवर अपलोड केला होता; तसेच निमंत्रण पत्रिकेचा व्हीडीओही त्यांच्या फेसबुक वॉलवर अपलोड केला होता. पण, ‘सरणावर जाताना मज इतकेच कळले होते...मरणाने सोडवले...पण जगण्याने छळले होते... अशा आशयाची चिठ्ठी त्यांनी लिहिलेली आढळली.

आरक्षण आंदोलनात केले होते नेतृत्व 
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कोळेकर यांनी औरंगाबादेत आंदोलनाची मोट बांधली होती. त्यांच्याकडे आरक्षणाच्या पूर्वतयारीचे नेतृत्व होते. सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com