प्रजासत्ताक दिनानिमित्त विमानतळावर हाय ऍलर्ट 

औरंगाबद ः विमानतळ परिसरावर तैनात जवान
औरंगाबद ः विमानतळ परिसरावर तैनात जवान

औरंगाबाद - प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने विमानतळावर हाय ऍलर्ट जारी करण्यात आला असून, यानिमित्ताने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. 


शनिवारी (ता. 26) साजरा होत असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. शहरात दोन दिवसांपूर्वी दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर विमानतळाची सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


दहशतवादविरोधी पथकाने मुंबई आणि औरंगाबादेतून आठ जणांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांना 5 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. इसिस या दहशतवादी संघटनेत काम करून संबंधित ठिकाणी बॉंब तयार करणे, हत्यारे पुरविणे या संशयासह आक्षेपार्ह साहित्य आढळल्यावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईने विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. यामुळेच केंद्रीय सुरक्षा बलाला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार विमानतळावर प्रत्येक प्रवाशाची कसून चौकशी करण्यात येत आहे. गुरुवारपर्यंत (ता. 31) ही तपासणी सुरू राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com