शिर्डी संस्थानने अशी मिळवली तूप खरेदीला परवानगी... 

सुषेन जाधव
शनिवार, 21 डिसेंबर 2019

शिर्डी येथे येणाऱ्या साईभक्तांना संस्थानमार्फत बुंदी दिली जाते. संस्थानच्या वतीने माफक दरात भातही भक्तांना दिला जातो. याशिवाय प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी गावरानी तुपाची गरज असते.

औरंगाबाद : श्री साईबाबा संस्थान शिर्डीला वर्षभरासाठी भक्तांना प्रसाद व इतर अन्न वितरित करण्यासाठी आवश्‍यक असलेले गावरानी तूप खरेदी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी परवानगी दिली. 

जानेवारी ते डिसेंबर 2020 या वर्षासाठी संस्थानला 8400 क्विंटल तुपाची आवश्‍यकता आहे. त्यासाठी अंदाजे 31 कोटी 63 लाख 86 हजार रुपये खर्च येणार आहे. यापूर्वीच्या खरेदीला दिलेल्या मान्यतेची मुदत डिसेंबर 2019 रोजी संपत असल्याने संस्थानच्या वतीने खंडपीठात पुढील वर्षासाठी तुपाची खरेदी करण्याकरिता दिवाणी अर्ज दाखल करण्यात आला होता.

प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी

पुढील वर्षीच्या ई-निविदा पूर्ण होईपर्यंत यापूर्वीच्या कंत्राटदार अथवा इतरांना पुरवठा करण्याची परवानगी मागण्यात आली होती. शिर्डी येथे येणाऱ्या साईभक्तांना संस्थानमार्फत बुंदी दिली जाते. संस्थानच्या वतीने माफक दरात भातही भक्तांना दिला जातो. याशिवाय प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी गावरानी तुपाची गरज असते. खंडपीठाने संस्थानची विनंती मान्य करून खंडपीठाच्या वतीने परवानगी देण्यात आली.

संस्थानच्या वतीने ऍड. नितीन भवर, ऍड. वसंत शेळके यांनी काम पाहिले. मूळ याचिकाकर्त्याच्या वतीने ऍड. प्रज्ञा तळेकर, ऍड. किरण नगरकर, ऍड. अजिंक्‍य काळे, ऍड. उमाकांत आवटे, शासनातर्फे ऍड. मंजूषा देशपांडे यांनी बाजू मांडली.

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High Court Allowed Shirdi Sansthan to Purchase Ghee of Rs. 31 Crore