उच्चशिक्षित युवकांनाही व्हायचंय होमगार्ड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

पोलिस दलातर्फे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये होमगार्ड नियुक्त करण्यासाठी आज व उद्या (ता. 25) भरती सुरू असून, होमगार्डच्या एकूण 242 जागा भरण्यात येणार आहेत. या जागांसाठी जिल्ह्यातील पाच हजार युवकांनी सहभाग घेतला. यात उच्चशिक्षित व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता.

बीड - पोलिस दलातर्फे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये होमगार्ड नियुक्त करण्यासाठी आज व उद्या (ता. 25) भरती सुरू असून, होमगार्डच्या एकूण 242 जागा भरण्यात येणार आहेत. या जागांसाठी जिल्ह्यातील पाच हजार युवकांनी सहभाग घेतला. यात उच्चशिक्षित व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता.

दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. शिक्षण पूर्ण होऊनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित युवक हताश होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने शहरातील पोलिस मुख्यालयावर सोमवारी (ता. 24) होमगार्डच्या 242 जागांसाठी भरती आयोजित केली. यात जिल्ह्यातून पाच ते सहा हजार युवकांनी उपस्थिती लावली. सर्वाधिक युवक उच्चशिक्षित होते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवकही भरतीसाठी आले. बीड जिल्ह्यातील युवक रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करीत असून, मिळेल ते काम व नोकरीच्या शोधात आहेत. होमगार्ड भरतीच्या निमित्ताने विदारक चित्र दिसून आले.

होमगार्ड भरतीच्या अटी
पोलिस दलातर्फे शहरात 24 व 25 जूनदरम्यान घेण्यात येत असलेल्या होमगार्ड भरतीसाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. वय किमान 20 ते कमाल 50च्या आत व उंची पुरुषांसाठी 162 सेमी, तर महिलांसाठी 150 सेमी आहे. पुरुषांसाठी धावणे 1,600 मीटर व महिलांसाठी 800 मीटर ही अट आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High Educated Youth Homeguard