(Video) बारा वर्षांनी पुलावरून वाहिली बेन्नीतुरा नदी

Bennitura River
Bennitura River

उस्मानाबाद - जेवळी (ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) व परिसरात सोमवारी  (ता. २१) पहाटेपासून जोरदार पाऊस झाला. पहाटे दोन ते सकाळी आठ या काळात येथील मंडल कार्यालयातील पर्जन्य मापकावर १०५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. जेवळी परीसरातून वाहणारी बेन्नीतुरा नदी ही दुथडी भरुन वाहत असून बारा वर्षांनी पुलावरून पाणी वाहिले आहे. या पुरामुळे नदी क्षेत्राच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

यंदा पावसाळा संपत आला तरी जेवढी परिसरात मोठा पाऊस न झाल्याने नद्या, नाले, तलावाचे पाणी वाढले नव्हते. यंदा लहान-मोठे प्रकल्पात बऱ्यापैकी पाणीसाठा होईल का अशी शंका व्यक्त होत असताना जेवळी व परिसरातील कासारआष्टा, दस्तापूर, भोसगा, आष्टामोड, वडगाव,  सय्यद हिप्परगा, फनेपुर, माळेगाव, विलासपुर (पांढरी) धानुरी, हराळी, करवंजी आदी गावात सोमवारी (ता २१) पाहाटे दोन ते सकाळी आठ या काळात वादळी वारा व मेघ गर्जनेसह अतिवृष्टी झाली आहे. जेवळी येथील मंडल कार्यालयातील बसविण्यात आलेल्या पर्जन्य मापकावर १०५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

यांदाच्या या मोठ्या पावसाने परिसरातील नदी, नाले, ओढ्यास मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. तर शिवारात ठिक- ठिकाणी बाध- बांधारयाची फुटा- फूट झाली असून सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यावेळी गावातील रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते. या जोरदार पावसाने बेन्नीतुरा नदी पात्र भरुन वाहत आहे. जवळपास बारा वर्षांनी आज बेन्नीतुरा नदीवरील अंबाजोगाई अक्कलकोट या राज्यमार्गावर असलेल्या येथील पुलावरून पाणी वाहीले आहे. यामुळे दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

पुराचे पाणी नदी पात्र सोडून दोन्ही बाजूच्या शेतात शिरल्याने मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जमीन खरडले असून अनेक विहिरीत पाणी गेल्याने विहिरीचे पडझड झालेले आहे. तसेच काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले असून सोयाबीन काढून गंजी लावलेले वाहून गेले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

परंतु या जोरदार पावसाने अनेक गावचा पाणीप्रश्न मिटला असून परिसरातील माळेगाव, विलासपूर पांढरी, भोसगा, हिप्परगा सय्यद आधी गावातील साठवण तलाव भरून वाहत आहेत. लोहारा तालुक्यात पावसाची एकूण सरासरी ७९९ मिमी एवढी असून आजच्या पावसानंतर तालुक्यात एकुण ८२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे आता लोहारा तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com