नांदेड जिल्ह्यातील दहा महसुल मंडळात अतिवृष्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. दोन दिवसापूर्वी किनवट व माहूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 65 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्या नंतर दोन दिवस थांबलेला पाऊस पुन्हा रविवारी दुपारनंतर सुरु झाला.

नांदेड: जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. दोन दिवसापूर्वी किनवट व माहूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 65 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्या नंतर दोन दिवस थांबलेला पाऊस पुन्हा रविवारी दुपारनंतर सुरु झाला.

रविवारी रात्री किनवट व माहूर तालुका वगळता इतर चौदा तालुक्यात दमदार पाऊस झाला. यामुळे मुदखेड तालुक्यासह जिल्ह्यातील दहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. यात मुदखेड 75, मुगट 68, बारड 66, उमरी 74,  सिंधी 75, मोघाळी 75, चांडोळा 70, धर्माबाद 72, अर्धापूर 66 व शहापूर 80 मिलिमीटर पाऊस झाला. सोमवारी (ता. 20) चोवीस तासांत झालेल्या पावसानंतर जिल्ह्यात एकूण 603.25 मिलिमीटर नुसार सरासरी 37.70 मिलीमीटर पाऊस झाला.

Web Title: High overwhelm in Nanded district