मराठवाड्याची होरपळ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

औरंगाबाद - उष्णतेच्या लाटेमुळे मराठवाड्याची होरपळ सुरूच असून परभणीत रविवारी (ता. 16) उच्चांकी तापमान नोंदले गेले. तेथे 43.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाती नोंद झाली. त्यानंतर नांदेड, उस्मानाबादचा क्रमांक लागला असून, तेथील पारा 43 अंशांवर होता. 

गेल्या काही दिवसांपासून सूर्य तळपता आहे. त्यामुळे सकाळी अकरापासूनच रणरणत्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. दिवसभर रणरणते ऊन आणि सायंकाळनंतर असह्य उकाड्याने नागरिक त्रस्त होत आहेत. भरदुपारी रस्त्यांवरील वर्दळ रोडावत असून बाजारपेठेलाही मरगळ येत आहे. मराठवाड्यात सर्वाधिक कडाका परभणीत असून यंदाच्या हंगामात आज तेथे किमान तापमानाने उच्चांक गाठला गेला. 

अन्य शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये असे - हिंगोली 42.0, औरंगाबाद 41.4, लातूर, बीड 41.0 

Web Title: High temperature in marathwada