मांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव

विकास गाढवे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

लातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याने मागील 31 वर्षाच्या इतिहासात यंदाच्या गाळप हंगामातील ऊसाला उच्चांकी दोन हजार 472 रूपये 57 पैसे प्रतिटन भाव दिला आहे. यात केंद्र सरकारकडून एफआरपीनुसार प्रतिटन मिळणाऱ्या अनुदानाची प्रतीक्षा न करता या भावानुसार होणारी फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिली.  

लोकनेते विलासराव देशमुख यांनी 31 वर्षापूर्वी माळरानावर साखर कारखान्याची उभारणी केली. तेव्हापासून कारखान्याने सन 2016 - 2017 या वर्षाचा अपवाद सोडला तर सर्व हंगामात यशस्वी गाळप केले आहे. ऊस लागवडीपासून साखर उत्पादनाच्या प्रक्रियेत कारखान्याने शिस्तीने कामकाज केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानूनच कारखान्याच्या संचालक मंडळाने कारभार केला. यामुळेच हा कारखाना मराठवाड्यातील साखर कारखानदारीसाठी दीपस्तंभ म्हणून नावारूपाला आला आहे.

चालू हंगामात एफआरपीनुसार प्रति टन दोन हजार 472 रूपये 57 पैसे भाव आला असून आतापर्यंत कारखान्याने प्रति टन 2 हजार 370 रूपये 57 पैशांनुसार रक्कमेचे शेतकऱ्यांना वाटप केले आहे. उर्वरीत 102 रूपये प्रति टनाप्रमाणे होणारी एफआरपीची रक्कमेत केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या प्रतिटन 55 रूपये अनुदानाचा समावेश आहे. मात्र, अनुदानाची प्रतीक्षा न करता कारखानयाने स्वनिधीतून उर्वरित 102 रूपये प्रतिटनाची रक्कम अदा करण्याचा निर्णय घेतला. खास गौरी-गणपती सणासाठी शेतकऱ्यांना ही रक्कम उपयोगात येईल, या भावनेने अध्यक्ष देशमुख आणि संचालक आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आणि ही रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे व कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी दिली.

उच्चांकी भावातून नवा विक्रम
मांजरा साखर कारखान्याने आतापर्यंत देश व राज्यपातळीवरील विविध प्रकारची 55 पारितोषिके मिळवलेली आहेत. यात उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता, साखर उतारा, उच्च पोल, उच्च बॉयलिंग हाऊस रिकव्हरी, रेड्युस्ड बॉयलिंग हाऊस रिकव्हरी, एक्सट्रॅक्शन, ऊस विकास, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, पर्यावरण व आदी महत्त्वाच्या पारितोषिकांचा समावेश आहे. चालू हंगामातही केवळ 163 दिवसात सात लाख आठ हजार 614 मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून विक्रम केला आहे. याच हंगामात ऊसाला सर्वाधिक भाव देऊन कारखान्याने इतिहास घडवला आहे. कारखाना स्थापनेपासूनच्या हंगामातील हा उच्चांकी भाव एक विक्रम असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Web Title: higher price to the sugarcane from manjara sugar factory