हा महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

hin.jpg
hin.jpg

कळमनुरी ः हिंगोली-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी खड्डे पडले अाहेत. त्यामुळे हा महमार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. वाहने उलटण्याचे प्रमाण वाढले असून किरकोळ अपघात तर नित्याचेच झाले आहेत.

हिंगोली-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील खानापूर चित्ता ते आखाडा बाळापूर, वारंगा फाटा या मार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे हा मार्ग अपघाताचा मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. जड वाहने व दुचाकी चालवणे सुद्धा अवघड झाले आहे. हा महामार्ग पुढे हैदराबादला जोडलेला आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. मात्र, या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताच्या घटनेतही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे आखाडा बाळापूर ते साळवा पाटीपर्यंत काही ठिकाणी साईडपट्या भरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे वाहने उलटण्याचे प्रमाण वाढले आहे.

साळवा पाटी परिसरात मागील आठवड्यातच तेलाचा टॅंकर उलटल्याची घटना घडली होती. डोंगरकडा परिसरात तर महामार्गाला ग्रामीण रस्त्याचे स्वरुप आले आहे. त्यामुळे वाहने एकेरी बाजूने चालवावी लागत आहेत. येरिगेशन कॅंप ते डोंगरगाव या दरम्यानही काही ठिकाणी खड्डे पडल्याने धोका निर्माण होत आहे. दररोज अपघाताच्या घटना घडत असताना खड्डे दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहेत. त्यामुळे वाहन चालक, वाहकांतून संताप व्यक्त केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी खड्डे भरण्यासाठी गिट्टी आणून टाकण्यात आली आहे. मात्र, दुरुस्ती केंव्हा करणार असा सवाल उपस्थित केला जात अाहे.

प्रशांत खेडेकर यांनी बजावली नोटीस

धोकादायक बनलेल्या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, यासाठी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला नोटीस बजावली आहे. गुरुवारपर्यंत(ता.२१) या मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करून हा मार्ग तातडीने वाहतुकीयोग्य करावा, अन्यथा शुक्रवारी (ता.२२) नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंत्‍यांनी आपली बाजू मांडण्यासंदर्भात कळमनुरी येथे सुनावणीसाठी उपस्थित रहावे, अशा सूचना उपविभागीय अधिकारी श्री. खेडेकर यांनी दिल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com