धनगर समाजाच्या आरक्षणासाठी महामार्ग रोखला

जलील पठाण
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्या व आरक्षणाच्या मुद्द्यावर सोमवारी (ता. 13) सकाळपासूनच धनगर समाजातील युवक येथील किल्ला मैदानावर जमा झाले. तेथून तानाजी चौक, जामामशीद, बसस्थानक, तहसील कार्यालय मार्गे हा मोर्चा  नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर असलेल्या टी पॉईंट चौकात आला.

औसा (जि. लातूर) : धनगर समजला आरक्षण मिळावे या मागणीसाठी औसा शहर आणि तालुक्यातील धनगर समाजातील तरुणांनी शहरातील टी पॉईंट चौकात धरणे आंदोलन सुरू केले असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ आंदोलनकर्त्यांनी रोखला आहे.

धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्या व आरक्षणाच्या मुद्द्यावर सोमवारी (ता. 13) सकाळपासूनच धनगर समाजातील युवक येथील किल्ला मैदानावर जमा झाले. तेथून तानाजी चौक, जामामशीद, बसस्थानक, तहसील कार्यालय मार्गे हा मोर्चा  नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर असलेल्या टी पॉईंट चौकात आला. चौकात टायर पेटवून व गाड्या रस्त्यावर आडव्या लावून महामार्गावरील वाहतूक रोखण्यात अली. आरक्षण आमच्या हक्काचं... नाही कुणाच्या बापाचं.... येळकोट येळकोट जय मल्हार... आदी व फडणवीस सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी परीसर दणाणून सोडला. रुग्णवाहिका सोडून कोणतेही वाहन आंदोलक सोडत नसल्याने चौकाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलीस प्रशासनाकडून कुठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: The highway was stopped for the reservation of Dhangar community