नांदेड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

हिमायतनगर - कर्जबाजारीपणाला कंटाळून भोडणीतांडा येथे एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

हिमायतनगर तालुक्‍यातील भोडणीतांडा येथील विष्णू अमरसिंग जाधव (वय 40) या शेतकऱ्याच्या पत्नीच्या व वडिलांच्या नावे जमीन आहे.

सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला असला, तरी अद्याप अंमलबजावणी झाली नाही. घरी आजारी वडील आणि आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वडिलांच्या दवाखान्याचा खर्च कसा करावा, या विवंचनेत ते होते. या नैराश्‍येपोटी त्यांनी काल (ता.1) विषारी औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी नांदेडच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: himaytnagar marathwada news farmer suicide