जालना : आगामी लोकसभेच्या निवडणुकासाठी अखिल भारत हिंदू महासभेनेही कंबर कसली असून जालना लोकसभेसाठी कडवट हिंदूत्ववादी विचाराचा उमेदवार रिंगणार उतरवणार असल्याची माहिती हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सुर्यवंशी शुक्रवारी (ता. 1) यांनी दिली.
आतापर्यंत भाजप-शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून देऊनही महत्वाच्या पदांवर त्यांच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी बसवून हिंदू मतदार व हिंदूत्ववादी संघटनांना दुर्लक्षित केल्याने हिंदू महासभा नाराज आहे. इतर समाजाची मते मिळवण्यासाठी हिंदूत्व विचाराचे कार्यकर्ते, संघटना यांच्यावर सतत अन्याय करण्यात आला. या सर्वांना कंटाळून हिंदूत्ववादी विचारांच्या संघटना आणि कार्यकर्त्यांची एक बैठक नुकतीच पार पाडली. या बैठकीत सर्वानुमते हिंदूत्व विचारसरणीचा आणि कडवट हिंदूत्ववादी उमेदवार उभा करण्याबाबत एकमत झाल्याचे सुर्यवंशी यांनी सकाळशी बोलताना सांगितले.
आगामी जालना लोकसभेसाठी अखिल भारत हिंदू महासभा नारळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. हिंदूत्ववादी संघटनेत काम करणाऱ्या, पदाधिकारी, प्रचारक यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. गजर पडल्यास हिंदू महासभेचा प्रसिद्ध चेहरा उमेदवार म्हणून निवडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांतिले. जालना लोकसभा निवडणूकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या पुढील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार बच्चू कडू यांच्यांनतर आता हिंदु महासभेनेही लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणात मत विभाजन होणार असल्याने खासदार दानवे यांच्या अडचणीत भर पडणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.