हिंगोली : कोरोना तपासणीत ४३ शिक्षक निघाले बाधीत

राजेश दारव्हेकर
Saturday, 28 November 2020

कोरोनाच्या संकटात टप्याटप्याने अनलॉक क्वॉरंटाईन केले जात असल्याने राज्याच्या शिक्षण विभागातर्फे नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्या करिता  हालचाली सुरू केल्या होत्या . त्यासाठी शासनाने  मान्यता देखील दिली होती

हिंगोली -  जिल्ह्यात एकीकडे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याकरिता काही दिवसापूर्वी मान्यता मिळाली. त्यापूर्वी शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केल्यामुळे जवळपास तीन हजार शिक्षकांनी थ्रोट स्वँब नमुने आहेत दिले. शुक्रवारपर्यंत ( ता. २७)  पर्यंत दोन हजार १३७ शिक्षकांच्या थ्रोट स्वँब नमुन्याची तपासणी केली असता त्यात ४३ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे .

 

कोरोनाच्या संकटात टप्याटप्याने अनलॉक क्वॉरंटाईन केले जात असल्याने राज्याच्या शिक्षण विभागातर्फे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याकरिता हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी शासनाने  मान्यता देखील दिली होती. परंतु शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली होती. त्यामुळे जवळपास तीन हजार शिक्षकांनी थ्रोट स्वँब नमुने दिले होते. 

हेही वाचा -  हिंगोली : जिल्ह्यात रब्बीच्या पिकांसाठी केवळ १३ टक्के कर्ज वाटप, बँकांची उदासीनता

प्रत्येक दिवशी जवळपास ३०० स्वँब नमुने तपासले जात आहेत. २७ नोव्हेंबरपर्यंत दोन हजार १३७ शिक्षकांच्या थ्रोट स्वँब नमुन्याची तपासणी केली असता त्यात ४३ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे या शिक्षकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत ७५१ शिक्षकांचे अहवाल प्रलंबीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. संपूर्ण शिक्षकाचे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.  त्यामुळे आता उर्वरित शिक्षकांच्या येणाऱ्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: 43 teachers affected in corona inspection hingoli news