हिंगोली : जिल्ह्यात नव्याने रविवारी ६३ रुग्ण बाधित तर १७ रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

राजेश दारव्हेकर
Monday, 7 September 2020

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली परिसर चार व्यक्ती रॅपीड अँटीजन टेस्ट द्वारे, तर हिंगोली परिसर २९ व्यक्ती, वसमत परिसर १२ व्यक्ती, कळमनुरी परिसर ११ व्यक्ती व सेनगाव परिसर सात व्यक्ती आरटीपीसीआर टेस्टद्वारे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर आज १७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हिंगोली : जिल्ह्यात आज ६३ नवीन कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी रविवारी ता.६  दिली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली परिसर चार व्यक्ती रॅपीड अँटीजन टेस्ट द्वारे, तर हिंगोली परिसर २९ व्यक्ती, वसमत परिसर १२ व्यक्ती, कळमनुरी परिसर ११ व्यक्ती व सेनगाव परिसर सात व्यक्ती आरटीपीसीआर टेस्टद्वारे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर आज १७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा -  आठवड्याभरानंतरही नांदेडला दिलासा नाहीच, रविवारी ३२८ जण पॉझिटिव्ह; सात रुग्णांचा मृत्यू

चार रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी ११ रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोरोना च्या चार रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण १५ रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण एक हजार ७१२ रुग्ण झाले असून, त्यापैकी एक हजार ४०१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण २९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोना मुळे जिल्ह्यात आतापर्यंत २० व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी कळविले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: 63 new patients were infected in the district on Sunday and 17 patients were discharged due to recovery hingoli news