हिंगोली : हिवरखेडा येथे आरोग्य विभागाकडून घरोघरी अँटीजन टेस्ट

लॉकडाउन काळात कोरोनाची संख्या जरी घटली असली. तरी मात्र कोरोनाच्या चाचण्या कमी होत असल्यामुळे खरा आकडा समोर येत नाही
सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील कोरोना चाचणी
सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील कोरोना चाचणी

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील हिवरखेडा येथे कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या कमी होताना दिसून येत आहे. मात्र हिवरखेडा येथे सध्या कोरोनाचे नऊ रुग्ण आहेत. त्यामुळे शनिवारी (ता. १२) आरोग्य विभागाच्या वतीने गावात अँटीजन तपासणी व आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली आहे.

लॉकडाउन काळात कोरोनाची संख्या जरी घटली असली. तरी मात्र कोरोनाच्या चाचण्या कमी होत असल्यामुळे खरा आकडा समोर येत नाही. सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णात कमालीची घट झालेली पहायला मिळत आहे. मात्र सेनगाव तालुक्यातील काही गावामध्ये अजूनही कोरोनाची संख्या कमी होताना दिसत नाही. हिवरखेडा गावात २२ जणांच्या आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आल्या आहेत. त्यामधे पाच जण पॉजिटिव्ह आढळून आले असून त्यांना सेनगाव येथिल कोविड सेंटरमध्ये क्वारनटाइन करण्यात आले आहे.

हेही वाचा - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकावर हल्ला केला. यामध्ये दोन नागरिकही मृत्यूमुखी पडले आहेत.

शुक्रवारी (ता. ११) हिवरखेडा गावात आरोग्य विभागाकडून कँप घेण्यात आला आहे. यामध्ये आरटीपीसीआरच्या १०१ टेस्ट करण्यात आल्या आहेत. व अँटीजन च्या ९२ टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण दोन रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. यावेळी उपस्थित साखरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथिल डॉ. गजानन कदम, डॉ. दिनेश घोडके, अशोक जोशी, मारोतराव पोले, आरोग्य सेवक नामदेव भिसे, आरोग्य सेविका जमुना कलासरे, सेवक नामदेव हाके, राजु देवकते, तसेच हिवरखेडा येथील सरपंच पूजा मस्के, अंगणवाडी शिक्षिका रंजनाबाई इंगळे, आशा वर्कर्स रेणुका गायकवाड, यांच्या पथकाकडून हा कँप घेण्यात आला.

गावात सर्वानी मास्क वापरा आणि सोशल डिस्टन्सचे पालन करा. असे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोनाच्या चाचण्या कमी होत आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुकाभरात आता कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची मागणी सुज्ञ नागरिकांतुन केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com