हिंगोली : अनुकंपाधारकांना समुपदेशनद्वारे नियुक्ती, पाच वर्षांची प्रकरणे निकाली 

file photo
file photo

हिंगोली : जिल्हा परिषदेमध्ये मागील पाच वर्षापासून अनुकंपा भरती झाली नसल्याने एवढी रिक्त पदे झाली. मात्र मागील बँक लॉग भरत काढत बुधवारी ता.१४ समुपदेशनद्वारे अनुकंपधारकाना नियुक्ती दिल्याने प्रलंबित अनुशेष निकाली काढण्यात हिंगोली जिल्हा परिषद मराठवाड्यातून अव्वल ठरली आहे.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागात अनुकंपधारकांची मागील पाच वर्षापासून म्हणजेच २०१५  पासून पदे रिक्त असल्याने अपुऱ्या कर्मचाऱ्या अभावी कामकाजावर परिणाम होत होता. जिल्हा परिषदेतील प्रलंबित रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी सीईओ राधाबीनोद शर्मा, अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी ,यांनी प्रयत्न चालविले होते. त्यानुसार डिसेंबर १९अखेर सरळ सेवेच्या कोट्यातील३९९ एवढी पदे रिक्त होती. प्रचलित शासन धोरणाच्या रिक्त पदांच्या २० टक्के प्रमाणे ८० टक्के अनुकंपा धारकांची भरती करणे आवश्यक होते. २०१९ मध्ये जवळपास१८ उमेदवारांना अनुकंपातत्वावर नियुक्ती देण्यात आली होती. उर्वरित ६२ उमेदवारांची भरती करण्यासाठी अनुकंपा जेष्ठता यादीतील एकूण उमेद्वारापैकी ७० उमेदवारांना बुधवारी उपस्थित राहण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या होत्या.

प्रवर्गानुसार पारदर्शकता ठेवत ५४ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली

जिल्हा परिषदेच्या सभागृहात बुधवारी उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.यावेळी उमेदवारांच्या शैक्षणिक अहर्ता , पात्रता ,प्रवर्गानुसार पारदर्शकता ठेवत ५४ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. तसेच एलईबीसी प्रवर्गातील एकूण आठ उमेदवारांच्या आरक्षणाला स्थगिती असल्याने नियुक्ती देता येत नसल्याने ही प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली. तसेच इतर पाच उमेदवारांना जेष्ठता असूनही अहर्ता, पात्रता व प्रवर्गानुसार पद उपलब्ध नसल्याने नियुक्ती देता आली नाही. यातील ५४ उमेदवारांना जेष्ठता, पात्रता, सर्व बाबी तपासून पडताळणी करून त्यांना सुपदेशन प्रक्रियेद्वारे नियुक्ती देऊन याच दिवशी पदस्थापणा व आदेश ही दिले आहेत. समुपदेशनमुळे  बहुतांश उमेदवारांना स्वतःच्या तालुक्यात पोस्टिंग मिळाली आहे.

तीस दिवसाच्या आत उमेदवार रुजू न झाल्यास त्याची नियुक्ती रद्द

यावेळी चार उमेदवार गैरहजर असल्याने त्यांचे आदेश काढता आले नाहीत. उमेदवारांनी तीस दिवसाच्या आत पदस्थापणा ठिकाणी रुजू होणे गरजेचे आहे. तीस दिवसाच्या आत उमेदवार रुजू न झाल्यास त्याची नियुक्ती रद्द करून जेष्ठता यादीतून नाव कमी केले जाणार आहे. समुपदेश निवड प्रक्रिया मध्ये सर्वात अधिक आरोग्य विभागाला कर्मचारी मिळाले असल्याने आरोग्य विभागाच्या बँक लॉग भरून निघाला आहे. या भारतीमुळे खाते प्रमुखांना देखील मदत मिळणार आहे. मागील पाच वर्षापासून भरती नसल्याने आजवरची ही सर्वात मोठी भरती प्रक्रिया पार पडली असून,ही प्रक्रिया पारदर्शक झाली आहे. त्यामुळे  प्रलंबित अनुशेष निकाली काढण्यात हिंगोली जिल्हा परिषद मराठवाड्यातून अव्वल ठरली आहे.

विभाग प्रमुखांची उपस्थिती

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, उपाध्यक्ष मनीष आखरे, सीईओ राधाबीनोद शर्मा ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार ,सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार,महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ,पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे ,यांच्यासह इतर विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

५४ अनुकंपा उमेदवारांना मिळाली नियुक्ती

 समुपदेशन प्रक्रिये द्वारे शिक्षण सेवक प्राथमिक सहा, कंत्राटी ग्रामसेवक आठ, पशुधन पर्यवेक्षक एक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक दोन, अंगणवाडी पर्यवेक्षिका एक,कनिष्ठ सहाय्यक लेखा दोन, औषध निर्माण अधिकारी एक, आरोग्य सेवक पुरुष  बारा, आरोग्य सेवक महिला एक,वरिष्ठ सहाय्यक  तीन,कनिष्ठ सहाय्यक चार, परिचर तेराअशा एकूण ५४ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com