Hingoli News: महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची तयारी

औंढा नागनाथ येथे मंदिराची रंगरंगोटी करून रोषणाई
aundha nagnath
aundha nagnathsakal

औंढा नागनाथ : येथे महाशिवरात्री महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. मंदिराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाईची कामे केली जात आहेत. शनिवारी (ता. १८) महाशिवरात्राच्या दिवशी श्री नागनाथाची पालखी सोहळा रात्री आठ वाजता होईल. मंगळवारी (ता. २१) रात्री १० वाजता रथोत्सव आणि महाप्रसाद वाटप केला जाणार आहे.

औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीनिमित्त १६ ते २२ फेब्रुवारीपर्यंत महाशिवरात्री यात्रा महोत्सव असणार आहे. विजया एकादशीचे कीर्तन शनिवारी सकाळी ११ ते १ या वेळेत उत्तम महाराज देशमुख यांच्या होणार आहे.

बुधवारी (ता. २२) सकाळी १०ते १२ या वेळेत नामदेव महाराज ढवळे चारढाणकर यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाशिवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, गार्ड प्रमुख बबन सोनुने, कृष्णा पाटील, रामप्रसाद उदगिरे, नागेश माने, गणेश उदगिरे यांच्यासह संस्थानचे सर्वच कर्मचारी महाशिवरात्र उत्सवाची तयारी करीत आहेत.

करत असताना नागनाथ मंदिरामध्ये पाहावयास मिळत आहे. दरम्यान, नागनाथ मंदिर परिसरामध्ये महाशिवरात्र उत्सवानिमित्ताने मोठा झुला, शेलम्बो, ब्रेक डान्स, तसेच विविध प्रकारची खेळणी तसेच विविध स्टॉल उभारण्यात आले आहेत.

व्यापाऱ्यांना आवाहन

महाशिवरात्र यात्रेमध्ये व्यापाऱ्यांनी, दुकानदारांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन नागनाथ देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले.

राज्य, परराज्यातून लाखोंच्या संख्येने औंढानागनाथ येथे भाविक दाखल होतात; तसेच दिंड्या, पालख्या येतात. यंदाही हा उत्सव भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. त्यासाठी नागनाथ देवस्थानने तयारी केलेली आहे.

सीसीटीव्ही कार्यान्वित

पोलिस प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. त्याचबरोबर मंदिर व मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. प्रत्येक हालचालीवर पोलिस प्रशासनाचे लक्ष राहणार आहे.

aundha nagnath
Hingoli : अर्थसंकल्पाचा तरूण उद्योजकांना होईल फायदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com