हिंगोली-औंढा राज्य रस्‍ता झाला बंद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

हिंगोली : हिंगोली ते औंढा नागनाथ जाणाऱ्या राज्य मार्गावर सध्या रस्‍त्‍याचे काम सुरू आहेत या रस्‍त्‍यावर एका पुलाचे काम सुरू असल्याने वळण रस्‍ता काढण्यात आला आहे. शनिवारी (ता. 3) सकाळी झालेल्या जोरदार पावसाने या ओढ्याला पुर आल्याने त्‍याचे पाणी रस्‍त्यावरून जात असल्याने हा रस्‍ता एक तास बंद झाला होता. 

जिल्‍ह्‍यात शुक्रवार मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने  रात्रभर काही ठिकाणी जोरदार, कोठे हलका तर रिमझीम पाऊस सुरू होता. शनिवारी दुपारी बारापर्यत पाऊस कायम होता. या पावसाने हिंगोली ते औंढा जाणाऱ्या रस्‍त्यावर सध्या रस्‍त्‍याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने या मार्गावर अनेक ठिकाणी पुलाची कामे सुरू आहेत. या मार्गावर असलेल्या एका पुलावर काढण्यात आलेल्या वळण रस्‍त्‍यावरील ओढ्याला पुर आल्याने हा मार्ग एक तास बंद झाल्याने रस्‍त्‍याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli Aundha road closed down due to heavy rain