हिंगोलीत सव्वातीन लाखाची बनावट दारू पकडली

hingoli
hingoli

हिंगोली - तालुक्यातील कोथळज शिवारात एका गोदामातून परराज्यातून आणलेली सव्वातीन लाख रुपये किंमतीची बनावट दारू पोलिसांच्या विशेष पथकाने पकडली. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध बासंबा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील कोथळज शिवारात एका गोदामात परराज्यातून बनावट विदेशी दारू आणून कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये ही दारू भरून या बाटल्या विक्रीसाठी पाठवल्या जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक योगेश कुमार अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक उदयसिह चंदेल, उपनिरीक्षक नितीन केनेकर, जमादार वसंत चव्हाण, राजेश ठोके यांच्या पथकाने गुरुवारी ( ता.१७ ) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कोथळज शिवारात छापा टाकला. 

या ठिकाणी सव्वातीन लाख रुपयांच्या विदेशी दारूचा साठा आढळून आला. तसेच खतांच्या पिशव्यांमध्ये विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या व बाटल्यांमध्ये दारू भरल्यानंतर बसविण्यात येणारे बूच आढळून आले. याशिवाय पोलिसांनी घटनास्थळावरून एक अल्टो कार देखील जप्त केली आहे. याठिकाणी बाहेर राज्यातील बनावट दारू आणून ही दारू बाटल्यांमध्ये भरून सीलबंद केल्यानंतर विक्रीसाठी पाठवली जात असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक नितीन केनेकर यांच्या तक्रारीवरून अश्विन महेश साहू (रा. गोलंदाज गल्ली हिंगोली) याच्याविरुद्ध बासंबा पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १८) पहाटे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष पथकाच्या या कारवाईमुळे परिसरात बनावट दारू तयार केली जात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आता ही दारू कोणत्या राज्यातून आणली तसेच यापूर्वी किती दारू विक्री झाली याचा शोध घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com