Crime News : मोटार सायकल चोरी करणारी अंतरजिल्हा टोळी गजाआड; चोरीच्या १७ मोटार सायकल जप्त | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime News

Crime News : मोटार सायकल चोरी करणारी अंतरजिल्हा टोळी गजाआड; चोरीच्या १७ मोटार सायकल जप्त

हिंगोली :येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटार सायकल चोरी करणारी अंतरजिल्हा टोळी गजाआड करुन त्यांच्या कडुन चोरीच्या १७ मोटार सायकल जप्त केल्या आहेत.

जिल्ह्यात होणारे मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघड करणे संदर्भाने जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे यांना सुचना देवून स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक नेमले होते.

त्याअनुषंषाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी ता.२९ पोस्टे नर्सी नामदेव येथे मोटर सायकल चोरीच्या गुन्हयासंदर्भाने संशयीत आरोपी योगेश शिंदे रा. सिध्देश्वर, दशरथ पवार रा. पेडगाव हे असून त्यांनी हिंगोली जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील मोटर सायकल चोरी केल्या आहेत. अशी गोपनिय माहिती मिळाल्यानंतर दोन्ही संशयीत आरोपीस ताब्यात घेतले.

विचारपुस केली असता आरोपींनी मोटर सायकल चोरी केल्याची कबूली देवून त्यांच्या ताब्यातून सहा लाख रूपयाच्या एकूण ०९ मोटर सायकल मुददेमालासह जप्त केल्या आहेत. अधिक विचारपूस केली असता त्यांनी नर्सी नामदेव, वसमत ग्रामीण, छ. संभाजीनगर हददीतील सातारा पोलीस स्टेशन परीसरातून मोटर सायकल चोरी केल्याची कबूली दिली असून एकून ०५ गुन्हे उघड झाले आहेत.

तसेच पार्डी मोड ता. कळमूनरी येथील गजानन पवार रा. पार्डी मोड ता. कळमनुरी येथील इसम हा चोरीच्या मोटर सायकल बाळगत आहे. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्यावरून नमूद आरोपीस ताब्यात घेवून त्यास मोटर सायकल बाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हे केल्याची कबूली दिली सदर आरोपीचे ताब्यातून एकून ०८ मोटर सायकल किंमती ०४ लाख ७० हजार रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

नमूद तिन्ही आरोपीकडून एकून १७ मोटर सायकल किंमती १० लाख ७० हजार रूपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीतांकडून अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.