हिंगोली : रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या एक लाख औषधी बाटल्याचे वाटप, डॉ. गुंडेवार यांचा उपक्रम

राजेश दारव्हेकर
Saturday, 8 August 2020

महामारीच्या काळात बरेच जण आपआपल्यापरीने गरजेच्या वस्तूंची वाढीव दरात विक्री करून नफा कमवणाऱ्यांचीही कमतरता नाही .

हिंगोली- हिंगोलीतील होमिओपॅथी डॉ. एस. एस. गुंडेवार यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या एक लाख औषधाच्या बाटल्याचे मोफत वाटप केले आहे.

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पांडव  नावाच्या एक लाख औषधांच्या बाटल्या या कोरोना योद्ध्याने मोफत वाटल्या आहेत. डॉ.गुंडेवार गेल्या पंचवीस वर्षांपासून  होमियोपॅथीची प्रैक्टिस करतात. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी प्रत्येकजण स्वतःला घरात ठेवत आहे. महामारीच्या काळात बरेच जण आपआपल्यापरीने गरजेच्या वस्तूंची वाढीव दरात विक्री करून नफा कमवणाऱ्यांचीही कमतरता नाही. मात्र , अशा या विदारक परिस्थितीत स्वतःचा जराही फायदा न बघता लोकांचे जीव वाचावे यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.

सध्या कोरोनाचा हाहाकार आहे

 डॉ . गुंडेवार यांनी या कालावधीमध्ये अनेक व्हायरल इन्फेक्शनवर औषधींचे शोध लावले आहेत. सध्या कोरोनाचा हाहाकार आहे . त्यामुळे प्रत्येक जण कोरोनापासून आपले संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करत आहे . डॉ .गुंडेवार यांनीही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या एका औषधाचा शोध लावला आहे . रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर कोरोनाची ताबडतोब लागण होते. यावर उपाय म्हणून गुंडेवार यांनी पाच औषधांचे एकत्र मिश्रण करून  पांडव नावाची औषधी तयार केल. या औषधांचे त्यांनी मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला. 

हेही वाचा -  नांदेड :दिवसभरात १८२ पॉझिटिव्ह ; ८२ जणांची प्रकृती चिंताजनक

भीती कायमची नाहीशी झाल्याचे सांगत आहे

सुरुवातीला त्यांनी पाच हजार औषधांच्या बाटल्या वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते . त्यांच्या औषधाला मागणी येऊ लागल्याने त्यांनी आत्तापर्यंत औषधांच्या एक लाख बाटल्या मोफट वाटप केल्या. रात्रंदिवस कोरोनाला हरवण्यासाठी परिश्रम घेणारे अनेक डॉक्टर देखील या  पांडव'चा आधार घेत असल्याचे डॉ . गुंडेवार यांनी सांगितले .  कोरोनामुळे त्यांनी तो  पांडव औषधाचा ज्या रुग्णांनी लाभ घेतला आहे तो प्रत्येक जण गुंडेवार यांना फोन करू, भीती कायमची नाहीशी झाल्याचे सांगत आहे.  गेल्या पंचवीस वर्षांपासून ते होमियोपॅथीची प्रैक्टिस करतात. त्यांनी या कालावधीमध्ये अनेक व्हायरल इन्फेक्शनवर औषधींचे शोध लावले आहेत. या औषधींमुळे अनेक रुग्णांना गुणदेखील आला आहे. 

सोबतच त्यांनी  पांडव औषधीचेही सेवन केले होते

राज्य राखीव दलातील कोरोना पॉझिटिव्ह जवानांना देखील ही औषधी  देण्यात आली होती. ही औषधी हिंगोली येथील राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या मालेगाव आणि मुंबई येथे कर्तव्य बजावण्यासाठी गेल्या होत्या. त्या परत आल्यानंतर त्यातील काही जवान कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. त्यांच्यावर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार केले गेले . सोबतच त्यांनी  पांडव औषधीचेही सेवन केले होते . त्यांना देखील या औषधामुळे निरोगी वाटत असल्याचे अनेक जवानांनी कळवले असल्याचे , डॉ . गुंडेवार यांनी सांगितले.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Distribution of one lakh bottles of medicine to boost immunity, Dr. Gundewar's initiative hingoli news