हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांनी केली कोविड सेंटरची पाहणी, घाबरु नका; जिल्हा प्रशासन तुमच्या पाठीशी 

file photo
file photo

हिंगोली : जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला मंगळवारी (ता. १३) जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अचानक भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांना धीर देत घाबरु नका जिल्हा प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कोविड सेंटरला भेट देऊन कोविड वॉर्डातील ऑक्सिजन व्यवस्था सुरळीत आहे किंवा नाही, ऑक्सिजनचा साठा भरपूर आहे का याची पाहणी करुन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जिल्ह्यात आजघडीला आठ हजार ९६८ कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरु आहेत. यातील सात हजार ७१९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला जिल्ह्यातील विविध कोविड सेंटर मध्ये एक हजार १२० रुग्णावर उपचार सुरु आहेत.३२९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अशा रुग्णांना रेमडेसिविरची आवश्यकता असते मात्र आजघडीला रुग्णालयात साठा संपलेला असल्याने आणखी गरजेनुसार मागणी करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यवंशी यांना दिल्या आहेत. तसेच कोविड सेंटर येथे उपलब्ध बेडची माहिती घेतली असता सध्या कोविड सेंटर येथे एकही बेड उलब्ध नसल्याने रुग्णांना औंढा रस्त्यावरील कोरोना केअर सेंटर मध्ये हलविण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधित डोसेज देखील थोड्या फार प्रमाणात उपलब्ध असून आणखी चार हजार लस मागविण्यात आली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटर येथे अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर काम भागविले जात आहे. एक डॉक्टर असून त्यांना भरती कारण्यापासून ते सुट्टी देण्या पर्यन्त कामे करावी लागत आहेत, त्यामुळे तात्पुरती का होईना रिक्त पदे भरल्यास इतर कर्मचाऱ्यांवर ताण पडणार नाही. जिल्हाधिकारी यांनी वेळ पडल्यास खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांना कोविड सेंटर मध्ये रुग्णावर उपचारसाठी नियुक्ती करावी अशी मागणी देखील केली जात आहे. मात्र जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात याकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागले आहे. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, आदींची उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com