हिंगोली : गृहविलगीकरणाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली

file photo
file photo

हिंगोली : येथील इंडियन मेडिकल असोसिएशन व दोन आमदारांनी सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात न ठेवता गृह विलगीकरणात राहू द्या अशी मागणी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र शनिवारी (ता. १९)  झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांनी सबसेल ही मागणी फेटाळून लावली आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात माझे कुटुंब, माझी जबादारी या मोहिमेअंतर्गत सुरु असलेल्या कार्यक्रमा निमित्य शनिवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबीनोद शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रसाद कुमार श्रीवास, प्रशांत तुपकरी आदींची उपस्थिती होती.

आरोग्य शिक्षण देण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिम

जयवंशी पुढे म्हणाले जिल्ह्यात मंगळवार ( ता.१५) पासुन माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ झाला.  या मोहिमेचे उदिष्ट कोरोना या विषाणुजन्य आजारावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविणे हा होय. तसेच जिल्ह्यातील  प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवून त्यांना आरोग्य शिक्षण देण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची सुरुवात झाली आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील  जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटूंबापर्यंत पोहचून आरोग्य शिक्षण देऊन प्रत्येकाची तपासणी करण्यात  येणार असल्याचे सांगितले.

कोरोनामुक्तीच्या लढयात सहभागी होऊया नियमित मास्कचा वापर करुया

आरोग्य विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या पथकाकडुन ता. १५ सप्टेंबर ते २५ ओक्टोम्बर या दरम्यान किमान दोन वेळा जिल्हयातील संपुर्ण कार्यक्षेत्रातील कुटूंबांपर्यंत पोहोचणार आहेत. या मोहिमेत पथकामार्फत दररोज ५० घरांना भेट देवून कुटूंबातील सदस्यांची आरोग्याविषयक तपासणी करुन आवश्यकता असल्यास जिल्हा कोरोना रुग्णालय, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोरोना केअर सेंटर या ठिकाणी पुढील उपचाराकरीता संदर्भित करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाविरुद्धच्या लढ्यात संरक्षण महत्वाचे असून प्रत्येकाने आरोग्यविषयक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी. कोरोनामुक्तीच्या लढयात सहभागी होऊया नियमित मास्कचा वापर करुया, शारिरीक अंतर ठेवू या, वारंवार हात धुवूया, सामाजिक जबाबदारी सर्वांनीच पाळूया  या सर्व बाबींचे पालन करुन आपणा सर्वांना कोरोनापासून सुरक्षित राहता येणार आहे. या मोहिमेत आपल्या जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी योगदान दिल्यास कोरोना नियंत्रणाचे लक्ष्य साध्य करता येणार आहे. सदर मोहिम यशस्वी करण्याकरीता आरोग्य विभागामार्फत शहरी भागाकरीता व ग्रामीण भागाकरीता खालील प्रमाणे पथक स्थापन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

गृह विलगीकरण करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे सांगितले

सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात न ठेवता त्यांना गृह विलगीकरण करून ठेवण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन व आमदार तान्हाजी मुटकुळे,संतोष बांगर यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागणी केली होती. परंतु जिल्हाधिकारी जयवंशी यांनी ही मागणी फेटाळत म्हणाले इतर जिल्ह्यात रुग्णांना गृह विलगी करण केलेजात नाही ,तसेच घरी संशयित रुग्ण ठेवल्याने रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे गृह विलगीकरण करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पस्ट केले. याशिवाय समान्य रुग्णालयात रुग्णांना औषधी साठा उपल्बध आहे काय असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता यावर जिल्हाधिकारी जयवंशी यांनी मुबलक प्रमाणात औषधी साठा असल्याचे सांगून वेळ मारून नेली.

सहा हजार ११९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

येथील सामान्य रुग्णालयात भरती केलेल्या कोरोना रुग्णांचा अहवाल येण्यास चार ते पाच दिवस लागत आहेत. त्यामुळे शासनाने जिल्ह्यात स्वतंत्र  लॅबची मागणी शासनाकडे केली होती.त्यानुसार ७० लाख रुपये मंजूर झाले असून, महिना अखेर कोरोना रुग्णासाठी लॅब सुरु होईल असे सांगितले. तसेच खरीप हंगामात शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला असता यावर जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, जून ते ऑगस्ट महिन्यात जवळपास सहा हजार ११९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ,त्यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे ४४ कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. पुन्हा उर्वरित पिकांच्या नुकसानीसाठी शासनाकडे मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

१७८५कर्मचारी तैनात केले

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत नियुक्त वैद्यकीय अधिकारी ३७, रुग्णवाहिका २९, एकूण लोकसंख्या १३,३५,७५३,एकूण घरांची संख्या २,२८,१२३,असून ५९५ पथके स्थापन केली आहेत.तर १७८५कर्मचारी तैनात केले आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com