esakal | ऑनलाईन स्वाध्याय उपक्रमात हिंगोली जिल्हा राज्यात अव्वल
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

स्वाध्यायच्या सोळाव्या आठवड्यात स्वाध्याय पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीनुसार जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

ऑनलाईन स्वाध्याय उपक्रमात हिंगोली जिल्हा राज्यात अव्वल

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : राज्यातील इयत्ता पहिली ते दहावीच्या सुरु झालेल्या स्वाध्याय उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेतले जात आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ऑनलाईन पध्दतीने स्वाध्याय उपक्रम राबविला जात आहे. स्वाध्यायच्या सोळाव्या आठवड्यात स्वाध्याय पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीनुसार जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षातील मार्च महिन्यापासून शैक्षणिक क्षेत्र प्रभावीत झाले आहे. शैक्षणिक वर्षे सन २०२०- २१ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे सुरु करण्यात आले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत संपर्क आणि संवादाचे माध्यम म्हणून व्हॉट्सअँप वापरून स्वाध्याय उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले होते. पहिली ते दहावीपर्यंत सर्व त्यांमधील विद्यार्थाच्या फोनवर प्रश्न मंजुषा तयार करण्यात येवून यात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यात आला होता.

डिजीटल पध्दतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून प्रश्न मंजुषा पूर्ण करुन घेण्यासाठी स्वाध्याय ही संकलाना राबविण्यात आली. त्यासाठी विभागनिहाय जिल्ह्यांसाठी स्वतंत्र व्हॉट्सप अँप क्रमांक निर्गमीत करण्यात आला. सदर क्रमांक जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी पोहचविण्यात आला. स्वाध्याय अंतर्गत दर शनिवारी विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्न पाठविण्यात आले. या प्रक्रियेचा दर पंधरा दिवसाने एका वरिष्ठ स्तरावरून जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. आतापर्यंतच्या स्वाध्याय झालेल्या सोळाव्या आठवड्यामध्ये हिंगोली जिल्ह्याने उत्कृष्ट काम केले आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येत या आठवड्यात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे, बुलढाणा दुसऱ्या तर हिंगोली तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र टक्केवारीच्या तुलनेत हिंगोली जिल्हा अव्वल आहे. औरंगाबाद विभागात हिंगोली जिल्ह्याने टक्केवारी व विद्यार्थी संख्येच्या दोन्ही विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

अमरावती कोकण विभागातून मुंबई, नागपूर विभागातून चंद्रपूर, नाशिक विभागातून जळगाव, पुणे विभागातून सातारा या जिल्ह्याने विभागनिहाय प्रथम क्रमांक पटकावले आहे. सोळाव्या आठवाड्यात जिल्ह्यातील ७९ हजार ८६२ विद्याथ्यांनी स्वाध्याय उपक्रमात सहभाग घेतला आहे.
ता. ८ मार्च रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील पाच हजार ६३९ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय अभ्यासक्रम सुरु केला होता. त्यातील पाच हजार ४०६ जणांनी पूर्ण केला. वसमत तालुक्यातील १० हजार ८१ विद्यार्थ्यांनी सुरुवात केली. नऊ हजार ५९६ पूर्ण, हिंगोली तालुक्यातील ११ हजार ४३ पैकी १० हजार ५६९ पूर्ण , कळमनुरी तालुक्यातील आठ हजार ४९५ पैकी आठ हजार २७० तर सेनगाव तालुक्यातील सात हजार चारपैकी विद्यार्थ्यांनी स्वाध्याय उपक्रमात सहभाग घेवून तो पूर्ण केला आहे. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संदिपकुमार सोनटक्के यांच्या मार्गदर्शनखाली स्वाध्याय उपक्रम मोहीम यशस्वी केली जात आहे. यासाठी शिक्षणाधिकारी जिल्हास्तरावर वेळोवेळी आढावा घेत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image