हिंगोलीत कोरोनाबाधितांचे द्विशतक; रविवारी आढळले सात रुग्ण

file photo
file photo

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच असून रविवारी (ता.सात) रात्री उशिरा आणखी सात रुग्ण वाढल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला. त्यामुळे आता एकूण रुग्णांची संख्या दोनशे झाली आहे.

सेनगाव क्वारंटाइन सेंटरमध्ये हे रुग्ण उपचार घेत आहेत. हे सर्व रुग्ण मुंबईहून सेनगाव येथे आले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण संख्या दोनशे झाली असून यातील १६३ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आता ३७ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. 

वसमत येथे १४ रुग्णावर उपचार

औंढा नागनाथमधील एका ३७ वर्षीय रुग्णावर औरंगाबाद येथील सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये १४ रुग्ण उपचार घेत असून यात हट्टा चार, गिरगाव दोन, अकोली एक, कुरुडवाडी एक, हयातनगर चार, कौठा एक, वसमत शहर एक या रुग्णांचा समावेश आहे.

तज्ज्ञ वैद्यकीय टिम मार्फत औषधोपचार 

हिंगोली आयसोलेशन वार्डात एकूण २२ रुग्ण उपचार घेत असून यात सुरेगाव एक, नागेशवाडी, एक, पहेणी दोन, चोंढी खुर्द सहा, बाराशिव दोन, सेनगाव तीन, रिसाला बाजार तीन, नगर परिषद कॉलनी हिंगोली चार या रुग्णांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. त्यांच्यावर तज्ज्ञ वैद्यकीय टिम मार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.

९७ संशयितांचा अहवाल प्रलंबित

जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ४८४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोन हजार १३८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून यातील दोन हजार १९० जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या २७५ संशयित भरती असून यातील ९७ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.


औंढा नागनाथ शहरातील रस्ते सील

औंढा नागनाथ : शहरातील गोबाडे गल्लीत राहणाऱ्या एका तीसवर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. हा युवक औरंगाबाद येथे उपचार घेत आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून शनिवारी (ता. सहा) संपूर्ण गल्ली सील करण्यात आली असून निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.

काही जणांना प्रशासनाकडून क्‍वारंटाइन

या पूर्वी सदरील युवकाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे हा युवक शहरात फिरल्याने अनेकांच्या संपर्कात आला आहे. प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत संपूर्ण मार्केट बंद ठेवले. संपर्कातील काही जणांना प्रशासनाकडून क्‍वारंटाइन केले आहे. 

शहरामध्ये २० पथकांमार्फत तपासणी 

नुकतीच परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना अचानक शहरात कोरणाबाधित रुग्ण आढळल्याने शहर पुन्हा बंद झाले आहे. दरम्‍यान, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचा वापर करा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात येत आहे. शहरातील रस्तेही बंद करण्यात आले आहेत. शहरामध्ये २० पथकांमार्फत १४ दिवस घरोघरी तपासणी केली जाणार असून रस्त्यांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com