esakal | Hingoli: २११२४६ शेतकऱ्यांच्या विमा कंपनीकडे तक्रारी
sakal

बोलून बातमी शोधा

पीक विमा योजना

हिंगोली : २११२४६ शेतकऱ्यांच्या विमा कंपनीकडे तक्रारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबर महिना अखेर झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. नुकसानग्रस्त दोन लाख ११ हजार २४६ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले सप्टेंबर महिना अखेर झालेल्या अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करणे गरजेचे आहे . जिल्ह्यातील नुकसानग्रस्त दोन लाख ११ हजार २४६ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत.

यंदाच्या खरीप हंगामात शेतकन्यांनी मोठ्या प्रमाणावर पीकविमा भरला आहे. जिल्ह्यात तीन लाखाच्यावर शेतकरी प्रधानमंत्री विमा योजनेत सहभागी झाले आहेत. ता. सात सप्टेंबर तसेच ता. २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीनसह कापूस , तूर व इतर पिकांचा समावेश आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध माध्यमातून पीकविमा कंपनीकडे नुकसानीच्या तक्रारी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने केले होते.

त्यामुळे मागील काही दिवसापासून तक्रारीचा ओघ वाढला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील ५६ हजार १६५ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या . त्यापैकी २७ हजार ७०१ ठिकाणचे पंचनामे पूर्ण करण्यात आले २७ हजार ६५८ पंचनामे अपूर्ण आहेत तर ८०६ तक्रारी काही कारणास्तव अपात्र ठरल्या आहेत. वसमत तालुक्यातील ५१ हजार ५६२ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी केल्या त्यापैकी २३ हजार ४९५ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत २७ हजार १९७ ठिकाणचे पंचनामे सुरू आहेत . ८७० तक्रारी अपात्र ठरल्या.

हिंगोली तालुक्यात २७ हजार ६५८ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. ७ हजार १२९ ठिकाणचे पंचनामे पूर्ण झाले असून १९ हजार ७१९ ठिकाणचे पंचनामे शिल्लक आहेत. तर ८१० तक्रारी अपात्र ठरल्या आहेत. कळमनुरी तालुक्यातील ४६ हजार २६३ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानीचे अर्ज केले आहेत . त्यापैकी १५ हजार ८२१ ठिकाणचे सर्वेक्षण पूर्ण २९ हजार १८६ ठिकाणचे पंचनामे शिल्लक आहेत. १२५६ तक्रारी अपात्र ठरल्या आहेत तर सेनगाव तालुक्यातील २९ हजार ५९८ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या त्यापैकी ५१५७ तक्रारीचे पंचनामे करण्यात आले असून २३ हजार ६१७ शेतकऱ्यांचे पंचनामे शिल्लक आहेत ८२४ तक्रारी अपात्र ठरल्या आहेत.

जिल्ह्यातील दोन लाख ११ हजार २४६ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी धाव घेतली आहे. त्यापैकी आतापर्यंत ७९ हजार ३०३ शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचनामे करण्यात आले आहेत तर आणखी एक लाख २७ हजार ३७७ तक्रारीचे पंचनामे करणे शिल्लक आहेत . तर ४ हजार ५६६ शेतकऱ्याचे तक्रारी अपात्र ठरल्या आहेत . यामध्ये एकाच शेतकऱ्याने अनेक अर्ज करणे यासह इतर कारणामुळे तक्रारी अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.

loading image
go to top