ऑनलाइन अभिलेख्यांमध्ये हिंगोली राज्यात पहिला 

ऑनलाइन अभिलेख्यांमध्ये हिंगोली राज्यात पहिला 

हिंगोली - हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्‍याने 31 मार्चला रात्री बारापर्यंत सर्व अभिलेखे ऑनलाइन अपलोड करून राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. त्यापाठोपाठ कळमनुरी तालुक्‍यातील शंभर टक्के ग्रामपंचायतींनीही अभिलेखे ऑनलाइन भरले आहेत. 

जिल्ह्यात 565 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींना प्रिया सॉफ्ट या संगणक प्रणालीमध्ये जमा, खर्च व इतर अभिलेखे ऑनलाइन करण्याच्या सूचना होत्या. ग्रामपंचायतींना शासनाच्या योजनांमधून मिळालेला निधी, त्यावर झालेला खर्च, गावपातळीवर झालेली कामे याची सविस्तर माहिती ऑनलाइन भरणे बंधनकारक होते. त्या-त्या आर्थिक वर्षात हे काम पूर्ण करण्याचेही सांगण्यात आले होते. 31 मार्चला रात्री बारापर्यंत सेनगाव तालुक्‍यातील सर्व म्हणजे 107 ग्रामपंचायतींनी माहिती प्रिया सॉफ्ट संगणक प्रणालीमध्ये ऑनलाइन भरून राज्यात पहिला क्रमांक मिळविला. त्यापाठोपाठ कळमनुरी तालुक्‍याने सर्व म्हणजे 125 ग्रामपंचायतींची माहिती भरून दुसरा क्रमांक मिळविला आहे. आता उर्वरित ग्रामपंचायतींची माहिती भरण्याचे काम सुरू आहे. लवकरच संपूर्ण जिल्ह्याची माहिती भरली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

हिंगोली जिल्ह्यात सध्या 477 ग्रामपंचायतींनी माहिती भरली असून, उर्वरित 86 ग्रामपंचायतींचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. वेळेत काम पूर्ण करणारा हिंगोली जिल्हा राज्यात पहिला ठरला आहे. 
- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, हिंगोली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com