हिंगोलीत पुन्हा नव्याने चार रुग्ण पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या ३३२ वर

राजेश दारव्हेकर
Sunday, 12 July 2020

शनिवारी (ता. ११)  वसमत येथील ४४ वर्षीय वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून तो सम्राट कॉलनी येथील आहे. तर ५७ वर्षीय गवळीपुरा  येथील महिलेसह तालाब    कट्टा हिंगोली, येथील दोघे असे आज चार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे रुग्ण संख्या ३३२ वर

हिंगोली :  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून रात्री साडेअकराच्या प्राप्त अहवालानुसार शनिवारी (ता. ११)  वसमत येथील ४४ वर्षीय वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून तो सम्राट कॉलनी येथील आहे. तर ५७ वर्षीय गवळीपुरा  येथील महिलेसह तालाब  कट्टा हिंगोली, येथील दोघे असे आज चार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे रुग्ण संख्या ३३२ वर गेली असल्याची माहिती डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.

हिंगोली शहरातील रिसाला बाजार, तालाब कट्टाअंतर्गत कोरोना बाधा झाल्याचे रुग्ण आढळून आले आहेत. प्रतिबंधात्मक बाबा म्हणून तेथील गरोदर महिला वयोवृद्ध नागरिक ज्यांना उच्य रस्क्तदाब आणि मधुमेहाचा आजार आहे .अशा३९ जणांचे थ्रोट स्वाब अहवाल तपसणीसाठी पाठविले होते. रिसाला बाजार येथील२६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर तालाब कट्टा येथील१३ अहवाला पैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोन अहवाल अनिर्णित आहेत.आणि नऊ अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. यामध्ये वीस गरोदर महिला व साठ वर्षाची वयोवृद्ध महिलेचा समावेश आहे. तसेच५७ वर्षीय महिला ही गवळी पुरा येथील असून ती पुणे येथून गावी परतली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाले. आजमितीला कोरोनाचे जिल्ह्यात चार रुग्ण आढळून आले आहेत.जिल्ह्यात आतापर्यन्त कोरोनाचे ३३२ रुग्ण झाले असून त्यापैकी २७२ रुग्ण बरे झाले आहेत . सद्यस्थितीत एकूण ६० रुग्णावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा -  Video - लॉकडाउनचा काळ लोकसंख्या वाढीस कारणीभूत ठरू नये, कोण म्हणाले...

आयसोलेशन वॉर्डात एकूण पंधरा कोरोना रुग्णावर उपचार सुरु

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात एकूण पंधरा कोरोना रुग्णावर उपचार सुरु असून यात रिसाला एक, मकोडी एक, बहिर्जी नगर दोन, गांधी चौक तीन, जीएमसी नांदेड एक, पेडगाव दोन, शुक्रवार पेठ एक, नवलगव्हाण एक, तालाब कट्टा एक, दौडगाव दोन यांचा समावेश आहे. याशिवाय वसमत येथील केअर सेंटर येथे १९ कोविड रुग्ण दाखल असून यामध्ये बहिर्जीनगर दोन, गणेशनगर एक, दर्गा पेठ एक, रिधोरा एक, टाकळगाव दोन,   जयनगर एक, वापटी एक,शुक्रवार पेठ सात, स्टेशन रोड एक, सोमवार पेठ एक ,सम्राटनगर एक या रुग्णाचा समावेश आहे. तसेच कळमनुरी येथील कोरोना सेंटर येथे नऊ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये विकासनगर दोन, नवी चिखली चार , डिग्रस एक, शेवाळा एक, नांदापूर एक या रुग्णांचा समावेश आहे.

४९५७ रुग्णांना घरी सुट्टी देण्यात आली

तसेच लिंबाळा अंतर्गत सेंटर येथे अकरा रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये तालाब कट्टा एक, प्रगतीनगर एक, भांडेगाव तीन, पिंपळखुटा एक, हनवतखेडा एक, कळमकोंडा चार यांचा समावेश असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर सेनगाव येथे तिघांवर तर औंढा येथे दोघांवर उपचार सुरु आहेत.
जिल्हा आयसोलेशन वॉर्ड व कोरोना केअर सेंटर आणि गावपातळीवर भरती केलेल्या रुग्णात एकूण  ५७२२ रुग्णावर उपचार सुरु आहेत. त्यापैकी ५११६ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ४९५७ रुग्णांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला ७५६ रुग्ण भरती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील ३१४ रुग्णांचे अहवाल येणे बाकी असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Hingoli, four new patients tested positive, number 332 hingoli news