हिंगोली जिल्ह्यात सोळाशे हेक्‍टरवर फळबाग लागवड होणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

त्रा कलमे सहा बाय तीन अंतरावर लागवडीनंतर पहिल्या वर्षी एक लाख दुसऱ्यावर्षी २९ हजार तर तिसऱ्यावर्षी २९ हजार रुपये असे एकूण एक लाख ६३ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. संत्रा कलमे साडेपाच बाय साडेपाच या अंतरावर लागवडीनंतर पहिल्यावर्षी ७९ हजार, दुसऱ्यावर्षी १८ हजार, तिसऱ्यावर्षी २३ हजार असे एकूण एक लाख २० हजारांचे अनुदान दिले जाईल

हिंगोली - जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चालू वर्षात सोळाशे हेक्‍टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार आंबा, संत्रा, आवळा आदी फळपिकांची लागवड करता येणार आहे.

जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कृषी विभागाला फळबाग लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी आता कृषी विभागाने शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत जागृती करण्यास सुरवात केली आहे. या योजनेमध्ये पाच बाय पाच अंतरावर आंबा पिकासाठी तीन वर्षांत एक लाख ८१ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. यामध्ये पहिल्या वर्षी एक लाख १८ हजार रुपये, दुसऱ्या वर्षी २९ हजार तर तिसऱ्या वर्षी ३३ हजार रुपयांचे हेक्‍टरी अनुदान दिले जाणार आहे.

या शिवाय संत्रा कलमे सहा बाय तीन अंतरावर लागवडीनंतर पहिल्या वर्षी एक लाख दुसऱ्यावर्षी २९ हजार तर तिसऱ्यावर्षी २९ हजार रुपये असे एकूण एक लाख ६३ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. संत्रा कलमे साडेपाच बाय साडेपाच या अंतरावर लागवडीनंतर पहिल्यावर्षी ७९ हजार, दुसऱ्यावर्षी १८ हजार, तिसऱ्यावर्षी २३ हजार असे एकूण एक लाख २० हजारांचे अनुदान दिले जाईल. आवळा कलमे सहा बाय सहा अंतरावर लागवड करणाऱ्यांना पहिल्यावर्षी ६३ हजार, दुसऱ्यावर्षी १८ हजार, तिसऱ्यावर्षी १९ हजार असे एकूण एक लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल. तर आठ बाय आठ अंतरावर लागवड केल्यास पहिल्या वर्षी ४७ हजार, दुसऱ्यावर्षी बारा हजार, तिसऱ्यावर्षी बारा हजार असे ७२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. तर सहा बाय सहा अंतरावर बोरांची रोपे लावल्यास पहिल्यावर्षी ५९ हजार, दुसऱ्यावर्षी २२ हजार तर तिसऱ्यावर्षी १८ हजार असे ९९ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी ७५ टक्के फळझाडे जिवंत राहतील त्यांनाच दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान दिले जाणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. पी. लोंढे यांनी सांगितले

Web Title: Hingoli to have horticulture farming