
कयाधू नदीपात्रावर घोटादेवी या ठिकाणी कोल्हापुरी साखळी बंधाऱ्याची निर्मिती मागील वर्षी करण्यात आली असून ,या साखळी बंधाऱ्याचा परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी पिकाच्या हळद, गहू, हरभरा, तुर, आदी पिकाच्या सिंचनासाठी व्हावा या उद्देशाने करण्यात आला आहे.
हिंगोली : तालुक्यातील सेनगाव हिंगोली दरम्यान वाहत असलेल्या कयाधू नदी पात्रावर चार ते पाच ठिकाणी कोल्हापुरी साखळी बंधाऱ्याची सिंचनासाठी निर्मिती करण्यात आली असून या बंधाऱ्याचे गेट बसविण्याचा संबंधित यंत्रणेला विसर पडला असून सद्यस्थितीत नदीपात्राचे पाणी वाहून जात असल्याने पात्र कोरडे पडत आहे.
कयाधू नदीपात्रावर घोटादेवी या ठिकाणी कोल्हापुरी साखळी बंधाऱ्याची निर्मिती मागील वर्षी करण्यात आली असून ,या साखळी बंधाऱ्याचा परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी पिकाच्या हळद, गहू, हरभरा, तुर, आदी पिकाच्या सिंचनासाठी व्हावा या उद्देशाने करण्यात आला आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातच गेट बसविल्याने नदीपात्रामध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा जमा झाला होता. पाणीसाठा जमा झाल्याने नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांनी पात्रांमध्ये मोटार बसून पाईपलाईन द्वारे पिकांना पाणी दिले तसेच परिसरातील अनेक विहिरी व बोअरच्या पाणीपातळी मध्ये वाढ झाल्याने त्यामुळे मागील उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई जाणवली नाही.
हेही वाचा - नांदेड : जागतिक दिव्यांग दिनी बेरोजगार दिव्यांगांनी काळा दिवस पाळत केला जिल्हा प्रशासनाचा निषेध -
यावर्षी अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे आता रब्बी पिकावर शेतकऱ्याची सर्व भिस्त असून त्यासाठी सिंचनाची आवश्यकता आहे. घोटा येथील कयाधू नदी पात्राचे पाणी आटत चालले असून डिसेंबर महिना उजाडला तरीही संबंधित यंत्रणेला कोल्हापूरी साखळी बंधाऱ्यावर गेट बसविण्याचा विसर पडलेला दिसत आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे