हिंगोली : पोटा येथील नदीपात्रातुन अवैध वाळु उपसा; दोन बोटीसह पाच लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त

file photo
file photo

हिंगोली : वसमत तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या पोटा शेळके येथील नदीच्या पात्रातुन अवैध वाळु उपसा करताना दोन बोटीसह पाच लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त करुन तीन जणांवर हट्टा पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १५) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या पोटा शेळके येथून वाहणाऱ्या पुर्णा नदीच्या पात्रातुन सोमवारी वाळु उपसा होत असल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांच्या पथकाने सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. 

यावेळी येथे दोन बोटीच्या सहाय्याने अवैध वाळुचा उपसा केला जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पोलिस आल्याचे लक्षात येताच येथे उपसा करणारे पळून गेले. दरम्यान, पोलिस कर्मचारी राजेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेख अफसर, रजाउल शेख, गोविंद मोटे सर्व रा. भोगावा ता. जिंतूर जि. परभणी व अन्य एक. यांनी संगणमत करून पुर्णा नदीच्या पात्रातून शासनाचा महसुल बुडविला यामुळे यांच्या विरुद्ध हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरुन दोन बोटी, २५ ब्रास वाळु, चार लोखंडी टाक्या असा पाच लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुढील तपास बी. जी. राठोड हे करीत आहेत. दरम्यान, पुर्णा नदी पात्रात रात्री बेरात्री देखील अवैध वाळू उपसा होत असल्याचे या भागात राहणारे गावकरी सांगत आहेत. यामुळे महसूल विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com