esakal | हिंगोली : गोंडाळा येथील अतिक्रमण धारकांच्या जमिनीच्या तात्काळ अहवालासाठी, ठेचा- भाकर आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तालुक्यातील गोंडाळासहित इतरही गावात अनुसूचित जातीच्या भुमिहिनानी १९९० पुर्वी पासून अतिक्रमण केले आहे. मात्र या जमिनीवर खड्डे खोदण्यात आले आहेत. 

हिंगोली : गोंडाळा येथील अतिक्रमण धारकांच्या जमिनीच्या तात्काळ अहवालासाठी, ठेचा- भाकर आंदोलन

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : तालुक्यातील गोंडाळा, गणेशपुर, वैजापुर, पहेणीसह अनेक गावातील अतिक्रमण धारकाच्या ताब्यात असलेल्या जमिनिचा अहवाल तातडीने देण्यासाठी मानवी हक्क सुरक्षा दल, भारतीय दलित आदिवासी प्ँथर सेनेतर्फे शनिवारी (ता. १४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेचा भाकर आंदोलन करण्यात आले.

तालुक्यातील गोंडाळासहित इतरही गावात अनुसूचित जातीच्या भुमिहिनानी १९९० पुर्वी पासून अतिक्रमण केले आहे. मात्र या जमिनीवर खड्डे खोदण्यात आले आहेत 

यामुळे त्यांना अडचणी येत आहेत. यामुळे त्यांच्या ताब्यात असलेल्या या जमिनी  त्या जमिनीचा अहवाल तात्काळ देण्यात यावा या मागणीसाठी ठेचा भाकर आंदोलन करण्यात आले. गोंडाळा येथे अकरा, गणेशपुर वीस, वैजापुर येथे बारा, पहेणी येथे सहा, अतिक्रमण धारक आहेत. यामध्ये श्रीरंग का़ंबळे, सुमन खडसे, संजय मस्के, बबन मोरे आदींचा यात समावेश आहे. १९९१ च्या शासन निर्णयाची अमलबजावणी न करता  त्यांच्या ताब्यात असलेल्या या जमिनीवर खड्डे खोदण्यात आले आहेत. ती वेळ परत येणार नाही याची दक्षता घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. 

यावेळी भाई जगदीश कुमार, प्रकाश राऊत, अशोक तिडके, प्रकाश उबाळे, गोविंदा उबाळे, रामचंद्र खंदारे, बबन मोरे, नंदा मोरे, कैलास चव्हाण आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा -  नांदेड : गावठी कट्टा आणि एअरगण पिस्टलसह आरोपी जाळ्यात- स्थागुशाची कारवाई -

हिंगोलीत झेंडूची फुले अभियान, शेतकऱ्यांकडून केली फुलांची खरेदी

हिंगोली : शेतमालाची खरेदी शेतकऱ्याकडून योग्य दराने व्हावी यासाठी दर वर्षी दिवाळीच्या दिवशी दिवशी झेंडूचीफुले अभियान राबवल्या जाते. या वर्षी शनिवारी ता. १४  हे अभियान कोरोना संकटामुळे सामुदायिक रीत्या राबवण्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर राबविण्यात आले.

झेंडूच्या फुलांना भाव मिळावा म्हणून झेंडूची फुले अभियान सुरू झाले. झेंडूच्या फुलांचे भाव शुन्यावर गेल्यानंतर  ५० रुपये  किलो दराने खरेदी करण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात आले होते.

ग्राहकांनीच शेतमालाचे भाव न करता खरेदी केली आणि ही खरेदी शेतकऱ्या कडूनच केली तर योग्य घरात पैसा जाईल ही भूमिका समोर ठेवून अभियान बाजारपेठेत हस्तक्षेप करून राबविण्यात आले.या वर्षी झेंडूच्या फुलासह सर्वच शेतमालाला ब-यापैकी भाव आहे. तरी देखील अती पावसामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे योग्य भावाने शेतमालाची खरेदी व्हावी. शेतमाला बरोबरच छोटेछोटे कुटीर उद्योगही वाढीस लागले पाहिजेत यासाठी गोडवा, पणत्या व दैनंदिन उपयोगी वस्तू गोर गरीब कारांगीराकडून भाव न करता खरेदी कराव्यात या साठी झेंडूची फुले अभियानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष खरेदी  करण्यात आली.

झेंडूची फुले १३० ऊस ६० रुपये  जोडी, पणत्या, ,फडे, बोळखे व फळे खरेदी करून अभियान राबवल्या गेले. या अभियानासाठी हिंगोलीत अन्ना जगताप, पंडित अवचार, प्रा. शालीकराम शिंदे, प्रा. विकास शिंदे, श्याम राऊत, चंद्रकांत कावरखे, दिपक सरनाईक यांनी  पुढाकार घेतला.

संपादन- प्रल्हाद कांबळे